शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

‘आउटडेटेड’ अंदाजपत्रकावर दहा तास खल

By admin | Updated: August 25, 2015 23:53 IST

महासभेची मंजुरी : सदस्यांकडून सूचनांसह तक्रारींचा वर्षाव; ग्रंथयात्रेचे आयोजन, बोट क्लबचा उपक्रम राबविण्याची घोषणाना

‘आउटडेटेड’ अंदाजपत्रकावर दहा तास खलमहासभेची मंजुरी : सदस्यांकडून सूचनांसह तक्रारींचा वर्षाव; ग्रंथयात्रेचे आयोजन, बोट क्लबचा उपक्रम राबविण्याची घोषणानाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ या वर्षासाठी आयुक्तांनी सहा महिन्यांपूर्वी सादर केलेले परंतु एलबीटी रद्द झाल्यामुळे सद्यस्थितीत आउटडेटेड ठरलेल्या अंदाजपत्रकाला महासभेत तब्बल दहा तासांच्या चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. यावेळी मोजक्या सदस्यांनी उत्पन्नवाढीसाठी सूचना मांडत काही नवीन प्रकल्प सुचविले, परंतु बव्हंशी सदस्यांनी आपापल्या प्रभागातील तक्रारींचा वर्षाव करत प्रशासनाला दूषणे दिली. महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये स्थायी समितीला सादर केले होते, परंतु तब्बल सहा महिन्यांच्या विलंबानंतर स्थायी समितीने आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ३३२ कोटी रुपयांची वाढ सुचवत १७६९ कोटी ९७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंगळवारी महासभेत सादर केले. स्थायी समितीचे विद्यमान सभापती शिवाजी चुंभळे यांनी महापौर अशोक मुर्तडक यांना अंदाजपत्रकाची प्रत सुपूर्द केली. त्यानंतर झालेल्या चर्चेत तब्बल ४३ सदस्यांनी अंदाजपत्रकावर भाष्य करत विविध मुद्यांचा उहापोह केला. सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे प्रभागांमध्ये विकासकामे खोळंबल्याचा आरोप करत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मनसेच्या गटनेत्यानेच सर्व सदस्यांचे वर्ष वाया गेल्याची खंत उद्वेगाने बोलून दाखविली. प्रामुख्याने नगरसेवकांचा निधी वाढविण्यात यावा, प्रभाग सभापतींनाही निधी मंजूर करावा, अंदाजपत्रकात आपत्कालीन स्थितीसाठी स्वतंत्र तरतूद करावी, शहराच्या हद्दीतील खेड्यांच्या विकासासाठी निधीची उपलब्धता असावी, राखीव निधी पूर्णपणे खर्च करावा, पाणीपुरवठ्यातील गळती थांबविण्यासाठी वॉटर आॅडिट करण्यात यावे, विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा, फाळके स्मारक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित होण्यासाठी पाठपुरावा करावा, शासनाकडे प्रलंबित असलेल्या जाहिरात धोरणाच्या मंजुरीसाठी प्रयत्न करावेत, अंतर्गत कॉलनी रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे, निधी वाटपात समतोलपणा असावा, रामकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे व्हावीत, निवृत्तिनाथ यात्रेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, ग्रंथयात्रा उपक्रम सुरू करावा, महापालिकेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचा पॅटर्न स्वीकारावा, कर्मचारी सहाय्यता निधी उभारावा आदिंसह विविध सूचनांसह तक्रारीही सदस्यांनी महासभेत मांडल्या. सुमारे दहा तासांच्या चर्चेनंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी सूचना-उपसूचनांसह अंदाजपत्रकाला मंजुरी देत असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)