शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या सहली पुन्हा होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

नाशिक : देवळालीगाव-विहितगावाला जोडणाऱ्या वालदेवी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. जुना आणि नवा असे दोन समांतर पूल असून ...

नाशिक : देवळालीगाव-विहितगावाला जोडणाऱ्या वालदेवी नदीवरील पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. जुना आणि नवा असे दोन समांतर पूल असून देवळालीगावाकडून जाणाऱ्या पुलाच्या सुरुवातीला असलेल्या उंचवट्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. पुलाचे सुशेाभीकरण तसेच दुरुस्तीचे काम करण्याची नागरिकांची मागणी आहे.

धन्वंतरी महाविद्यालयात योग दिन

नाशिक : कामटवाडे येथील धन्वंतरी मेडिकल कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सरोज धुमणे पाटील उपस्थित होत्या. योग प्रशिक्षक शीतल देशमुख यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व आणि त्याची अभ्यासात होणारी मदत याविषयी मार्गदर्शन केले.

व्यवसाय शिक्षक महासंघाचे उपोेषण

नाशिक : व्यवसाय शिक्षकांना देण्यात येणारे मानधन हे गेल्या दहा महिन्यांपासून दिले गेलेले नाही. समग्र शिक्षा अभियान यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे व्यवसाय शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्रयस्थ संस्था आणि व्यवसाय शिक्षण यामुळे शिक्षक आर्थिक अडचणीत असल्यामुळे यातून तोडगा काढण्यासाठी येत्या २८ रोजी मुंबईत आझाद मैदान येथे उपोेषण करण्यात येणार असल्याचे व्यवसाय शिक्षक महासंघाने कळविले आहे.

सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक अडचणीत

नाशिक : एस.टी. महामंडळातील नियमित कर्मचारीच नव्हे तर सेवानिवृत्त कर्मचारीदेखील आर्थिक अडचणीत सापडले आहेत. निवृत्तीनंतरही या कर्मचाऱ्यांना वेतनफरकाची रक्कम तसेच रजेची रक्कमही मिळालेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून कर्मचारी आपल्या हक्काच्या पैशांसाठी महामंडळाकडे मागणी करीत आहे. मात्र, त्यांना दाद दिली जात नाही.

उद्यानांबाबतची संभ्रमावस्था कायम

नाशिक : कोरोनाच्या निर्बंधामुळे सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आलेली आहेत. जॉगिंग ट्रॅक सकाळच्या वेळेसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्यानेदेखील सुरू आहेत. मात्र, काही भागांतील उद्याने निर्बंधांची कारणे सांगून बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे उद्यानांना परवानगी आहे किंवा नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था दिसते.