शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. वेतनाचा मुद्दा खंडपीठाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:12 IST

 नाशिक : महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांच्या सातव्या वेतन आयोगाचा मुद्दा सोमवारी द्विस्तरीय खंडपीठासमोर मांडण्यात येणार असून, खंडपीठाने त्याबाबत समितीला कळविल्यानंतर एस.टी. कामगार संघटना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मंगळवारी मुंबईत एस.टी. कामगार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक असल्याने या बैठकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.एस.टी. महामंडळातील कर्मचाºयांना सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह ...

ठळक मुद्देआज सादर होणार  मसुदा : कर्मचाºयांचे लागले लक्षइंटक संघटनेने मागील आठवड्यात पुन्हा एकदा बंदची हाक दिली होती

 

नाशिक : महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांच्या सातव्या वेतन आयोगाचा मुद्दा सोमवारी द्विस्तरीय खंडपीठासमोर मांडण्यात येणार असून, खंडपीठाने त्याबाबत समितीला कळविल्यानंतर एस.टी. कामगार संघटना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मंगळवारी मुंबईत एस.टी. कामगार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक असल्याने या बैठकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.एस.टी. महामंडळातील कर्मचाºयांना सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रमुख मागण्यासठी एस.टी. कामगार संघटनांनी १७ ते २० आॅक्टोबर या कालावधीत संप पुकारला होता. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नियुक्त करून या समितीने वेतनासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशान्वये स्थापन झालेल्या समितीने अहवाल तयार केला असून, काही तांत्रिक कारणांमुळे दोनदा न्यायालयात अहवाल सादर होऊ शकला नाही. आता सोमवार, दि. १५ रोजी द्विसदस्यीय खंडपीठापुढे कर्मचाºयाचा अहवाल सादर होणार आहे.समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला असून, राज्य शासनाचे वकील हा अहवाल आता खंडपीठासमोर सादर करणार आहेत. सोमवारी अहवाल सादर केल्यानंतर याबाबतच्या शिफारशींबाबत एस.टी. कामगार संघटनेला कळविले जाणार आहे. मंगळवार, दि. १६ रोजी लागलीच संघटनेचे मुंबईत प्रांतिक बैठक असल्यामुळे या शिफारशींबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न सरकार आणि संघटनेमध्ये केले जाण्याची शक्यता असून, काही मुद्द्यांवर तडजोड करण्याची भूमिका संघटनेने यापूर्वीच जाहीर केल्यामुळे यातून सकारात्मक मार्ग निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इंटकच्या बंदबाबत अस्पष्टताएस.टी. कर्मचाºयांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी कामगार संघटनेबरोबर असलेल्या इंटक संघटनेने मागील आठवड्यात पुन्हा एकदा बंदची हाक दिली होती. वेतनाबाबत निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचे सांगून मकर संक्रांतीला कामबंदचा इशारा दिला होता.बंदबाबत इंटकने कोणतीच ठाम भूमिका न घेतल्यामुळे बंदचा बार फुसका ठरला. मात्र यामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. त्यांनी दिवसभर याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. इंटककडून मात्र अधिकृत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही.