शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

एस.टी. बसमधील अग्निशमन यंत्रे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:16 IST

राज्यात काही ठिकाणी बसला आग लावल्याची तसेच काही जिल्ह्यांमध्ये चालत्या बसला आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. रस्त्यावर बस धावत ...

राज्यात काही ठिकाणी बसला आग लावल्याची तसेच काही जिल्ह्यांमध्ये चालत्या बसला आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. रस्त्यावर बस धावत असताना कोणतीही दुर्घटना घडली तर त्यासाठीची सज्जता असावी म्हणून महामंडळाकडून बसमध्ये प्रथमोपचार पेटी तसेच अग्निशमन यंत्रे बसविण्यात आलेली आहेत. परंतु सुरक्षिततेसाठी असलेल्या या साधनांची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. अनेक प्रथमोपचार पेट्या या रिकाम्या झाल्या आहेत तर अग्निशमन यंत्रे ही चालक केबीनमध्ये चालकाच्या सीटखाली धूळखात पडलेल्या आहेत.

या यंत्रांचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याचे देखील दिसून आले. काही अग्निशमन यंत्रांवरील तारखेचा तपशीलच गायब असल्याचे दिसले. सिलिंडरवरील मजकूर लिहिण्यात आलेला कागद फाडला असल्याचेही या पाहणीत आढळून आले.

--इन्फो--

या बसमध्ये आढळली नाहीत अग्निशमन यंत्रे

१) इगतपुरी-नाशिक (एमएच१२/इएफ/६८३९)

२) नांदगाव-ब्राह्मणवाडे (एमएच१४/बीटी/०३८४)

३) नाशिक-नंदूरबार (एमएच१४/बीटी/३७९९)

४) कुशेगाव-इगतपुरी (एमएच१४/बीट/१७०८)

५) नाशिक-सुकेणे (एमएच१५/एके/८०७३)

--इन्फो--

प्रथमोपचाार पेट्यांची दुरवस्था

बसमध्ये लावण्यात आलेल्या प्रथमोपचार पेट्या केवळ नावालाच उरल्या आहेत. काही पेट्यांमध्ये केवळ कापूस आढळून आला तर काही रिकाम्या पडल्या आहेत. असलेल्या पेट्या देखील सुस्थितीत नसल्याचे या पाहणीत आढळून आले. यातील औषधे वापरास योग्य आहे की नाही याची पाहणी होत नसावी असे या पेट्यांच्या अवस्थेवरून दिसून येते. काही अर्धवट लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्या. प्रवासी औषधे काढून घेत असल्याने पेट्या रिकाम्या असल्याचे एका चालकाने सांगितले.

--इन्फो--

वायफाय सुविधा नावालाच

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये वायफाय सुविधा देण्यात आलेली आहे, परंतु ही सुविधा आता बंद झाल्याचे दिसून आले. या सुविधेचा उपयोग होत नसल्याने आता ही सुविधा बंद करण्यात आलेली आहे. मोबाईलचे नेट कनेक्शन प्रवासामध्येही मिळत असल्याने महामंडळाच्या वायफायचा तसाही उपयोग होत नसल्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेली व्यवस्था आता मोडकळीस आली आहे.

--इन्फो-

अंतर्गत खडखडाट कायम

महामंडळाच्या ग्रामीण भागात चालणाऱ्या अनेक बस अजूनही सुस्थितीत नाहीत. सर्वाधिक चालक केबीनची दुरवस्था झाल्याचे दिसते. केबीनमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या पाण्याच्या बाटल्या, ब्लँकेट, चादर, बसला बाहेरून लावण्यात आलेले ॲल्युमिनियमचे पॅच आणि आतील भागात नादुरुस्त वाजणाऱ्या खिडक्यांची समस्या कायम आहे.

--इन्फो--

कुणीही या आगारात गाड्या लावा

नाशिकमधील जुने सीबीएस आणि ठक्कर बझार नवीन बसस्थानक येथे खासगी वाहनांचा शिरकाव झाला आहे. अनेक लोक आपली खासगी दुचाकी, चारचाकी बसस्थानकात उभी करीत असल्याचे चित्र आहे. जुने सीबीएस येथील आवारात तर चारचाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग तयार झाले आहे.न्यायालयातील अनेक कर्मचारी स्थानक आवारात आपली दुचाकी, चारचाकी उभी करतात.

--इन्फो--

मद्यपी, भिकाऱ्यांचा अड्डा

जुने सीबीएस तसेच ठक्कर बझार बसस्थानकाचा ताबा मद्यपी आणि भिकाऱ्यांनी घेतला असल्याचे दिसते. विशेषत: जुने सीबीएस बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस अनेक मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो. उरलेल्या जागेत प्रेमीयुगलांचे वास्तव्य वाढलेले आहे. स्थानक इमारतीच्या पडलेल्या भिंतीचा उपयाेग लघुशंकेसाठी केला जात आहे. रात्रीच्या सुमारास स्थानकाच्या आवारात भिकाऱ्यांनी वास्तव्यास येत असल्याचेही दिसून आले.

--इन्फो--

सर्व बसच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. अग्निशमन यंत्रे प्रत्येक गाड्यांना बसविण्यात आलेली आहेत. वेळोवेळी सिलिंडर भरून घेतले जाते. यंत्रणा चालविण्याचे प्रशिक्षण चालक, वाहकांना देण्यात आलेले आहे असे महामंडळाच्या कार्यशाळा विभागाकडून सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र बसमधील परिस्थिती वेगळी आहे. सोयीसुविधांच्या बाबतीत तसेच देखभाल दुरुस्तीची अनेक कामे करण्याची वेळ आलेली असतानाही बस रस्त्यावर धावत आहेत.

===Photopath===

230221\23nsk_50_23022021_13.jpg

===Caption===

बसेसमधील अग्निशमन यंत्रांची आवस्था