शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. कर्मचाऱ्यांना खात्यात दोन दिवसात वेतन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:11 IST

नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या एस.टी. महामंडळाला राज्य शासनाकडून ६०० कोटी रुपयांची मदत मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यातील वेतनाचा प्रश्न ...

नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या एस.टी. महामंडळाला राज्य शासनाकडून ६०० कोटी रुपयांची मदत मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या मे महिन्यातील वेतनाचा प्रश्न मिटला असून येत्या दोन दिवसात कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनाची रक्कम जमा हेाण्याची शक्यता आहे. महामंडळाकडे मदतीची रक्कम वर्ग होण्यास विलंब लागल्यास मात्र पुढील आठवड्यापर्यत प्रतीक्षा करावी लागू शकते.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यात गेल्या १५ एप्रिलपासून बसेस बंद करण्याची वेळ आल्याने महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बसेसचा वापर करण्याची परवानगी असली तरी त्या माध्यातून महामंडळाला फारसे उत्पन्न मिळू शकले नाही. उत्पन्नाचा मार्गच बंद झाल्यामुळे महामंडळाला खर्च भागविणेदेखील कठीण झाल्याने कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

या संदर्भात मुंबईत वित्तमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच महामंडळाच्या बैठकीस राज्य शासनाकडून एस.टी. महामंडळाला ६०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील सुमारे ९८ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न तूर्तास मिटला आहे. यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू राहिल्यास एस.टी.च्या बसेस सुरळीत होऊन उत्पन्नाचा मार्ग सुकर होऊ शकेल. मात्र पुन्हा तिसऱ्या लाटेत काही विपरीत परिस्थिती उद‌्भवली तर महामंडळाला पुन्हा आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महामंडळाकडून पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधले जात आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जानेवारीत बसेस सुरू झाल्याने महामंडळाची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा लॉकडाऊनची स्थिती ओढवली. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्याने महामंडळापुढे मोठा प्रश्न होता. तूर्तास यातून मार्ग काढण्यात आला असला तरी जसजशी बससेवा पूर्वपदावर येईल तेवढे महामंडळाला उत्पन्न मिळणार आहे. गेल्या दोन वर्षात महामंडळाला दोनदा राज्य शासनाकडून मदत घेण्याची वेळ आली आहे.

--इन्फो--

नाशिक विभागाला लागतात ८ कोटी

नाशिक विभागात सुमारे साडेचार हजार इतके कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अंदाजे ८ कोटी इतका खर्च करावा लागतो. इतर दैनंदिन खर्चदेखील मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. महामंडळाचे विभागातील जाळे मोठे असून आर्थिक उलाढाल देखील मोठी आहे.