शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शहर बसेस बंद करण्यावर एसटी महामंडळ ठाम

By admin | Updated: May 16, 2017 00:42 IST

नाशिक : शहर बससेवा चालविण्याबाबत महापालिकेकडून स्पष्ट नकार देण्यात आल्यानंतरही एस. टी. महामंडळाने शहरातील बससेवा हळूहळू बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहर बससेवा चालविण्याबाबत महापालिकेकडून स्पष्ट नकार देण्यात आल्यानंतरही एस. टी. महामंडळाने शहरातील बससेवा हळूहळू बंद करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील विविध मार्गांवरील सुमारे १२५ बसफेऱ्या बंद करण्यात आल्या असून, टप्प्याटप्प्याने सर्व बसेस बंद करण्याची मानसिकता महामंडळाने केली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारचे फेऱ्या कपात करताना महामंडळाने कुणालाही विश्वासात न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहर बससेवा चालविण्याची प्राथमिक जबाबदारी ही महापालिकांची असल्याने नाशिक महापालिकेने शहर बससेवा चालविण्यास घ्यावी, असा पत्रव्यवहार गेल्या जानेवारीपासून महामंडळाने सुरू केला आहे. महामंडळाने दोन वेळा निर्वाणीचे पत्रेही महापालिकेला धाडली आहेत. या पत्रांना उत्तर देताना महापालिकेने बससेवा चालविण्यास असमर्थता दर्शवित पालिकेसाठी हा ऐच्छिक विषय असल्याचे उत्तर परिवहन महामंडळाने दिलेले आहे. असे असताना एस.टी. महामंडळाने पालिकेशी कोणतीही चर्चा न करता शहरातील बसेस बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आत्तापर्यंत विविध मार्गांवरील १२५ बसफेऱ्या बंद करण्यात आल्या असून, गेल्या दोन महिन्यांत २० किलोमीटरची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. एस.टी. महामंडळाने पहिल्या टप्प्यात बसफेऱ्या बंद करण्यावर भर दिला असून, ज्या भागात उत्पन्न कमी आहे अशा मार्गावरील बसेस बंद करण्यात येणार आहे. मात्र पुढे टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहराची बसच बंद करण्यात येईल, असा ठाम विश्वास येथील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नाशिक शहरात सुमारे २२५ बसेसच्या माध्यमातून ४२ ते ४५ हजार किलोमीटरपर्यंत बसेस चालविल्या जातात. डेपो एक आणि डेपो क्रमांक दोन याप्रमाणे शहरातून बससेवा चालविली जाते. आता या दोन्ही डेपोचे रोजचे उत्पन्न, बसेसच्या फेऱ्या आणि भारमान याबाबत माहिती संकलनाचे काम जोरदार सुरू आहे. या माहितीवरूनच महामंडळाने शहरातील सुमारे १२५ बसफेऱ्या बंद केल्या आहेत. महामंडळाने उचलेल्या या धाडसी पावलामुळे शहर बस ही पालिकेलाच चालवावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.