शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळी शिवारात बिबट्याकडून श्वान फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:23 IST

विल्होळी परिसरातील दत्तनगर, सहाणे मळे भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, त्याने अनेक कुत्रे तसेच जनावरांवर हल्ले चढवून फस्त केल्यामुळे परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, मजूर दहशतीखाली आहेत.

विल्होळी : विल्होळी परिसरातील दत्तनगर, सहाणे मळे भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असून, त्याने अनेक कुत्रे तसेच जनावरांवर हल्ले चढवून फस्त केल्यामुळे परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, मजूर दहशतीखाली आहेत. वन खात्याने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. दिवसाही त्याचे दर्शन होत असल्याने सध्या पावसाळा सुरू असताना ग्रामस्थांना शेती कामासाठी बाहेर पडता येत नाही.बिबट्याच्या दहशतीमुळे रात्र-रात्र जागून पहारा द्यावा लागतो. अनेक शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून येतात त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीने घर केले आहे. वनखात्याने त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करून, परिसर दहशत मुक्त करावा, अशी मागणी विष्णू सहाणे, परशराम सहाणे, कैलास भावनाथ, मोतीराम भावनाथ, रामदास कडलक, ज्ञानेश्वर भावनाथ, दिगंबर खांडबहाले, भास्कर चव्हाण, बबन सहाणे आदींनी केली आहे.अनेक दिवसांपासून विल्होळी परिसरात बिबट्याचा वावर असून, याबाबत अनेक वेळा वनविभागाला फोनद्वारे व लेखी स्वरूपात तक्रारी केल्या. परंतु यावर वनविभागाने तक्रारींचे निवारण केले नाही. पिंजराही लावला नाही. परिसरातील नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे.- बाजीराव गायकवाड,  सरपंच, विल्होळी

टॅग्स :leopardबिबट्याdogकुत्राforest departmentवनविभाग