शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भंगार बाजाराचे अतिक्रमण रोखण्यासाठी फिरते पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:12 IST

सातपूर-अंबड लिंकरोडवर पुन्हा भंगार बाजार वसू नये यासाठी महापालिकेने पोलिसांच्या मदतीने एक फिरते पथक तयार केले असून, सदर पथकाची करडी नजर परिसरावर असणार आहे. सदर पथकाला दररोज वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी काढले आहेत.

नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवर पुन्हा भंगार बाजार वसू नये यासाठी महापालिकेने पोलिसांच्या मदतीने एक फिरते पथक तयार केले असून, सदर पथकाची करडी नजर परिसरावर असणार आहे. सदर पथकाला दररोज वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी काढले आहेत. महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये भंगार बाजार हटविण्याची कारवाई केली होती. मात्र, पुन्हा एकदा भंगार बाजाराने हातपाय पसरले होते. भंगार माल विक्रेत्यांनी तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून मोठ्या प्रमाणावर माल आणून ठेवला होता. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने संबंधित व्यावसायिकांना पुन्हा एकदा नोटिसा बजावत कारवाईचा इशारा दिला होता परंतु, व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने व्यावसायिकांची याचिका फेटाळून लावत दहा हजाराचा दंड ठोठावला होता. त्यानंतर महापालिकेने दि. १२ आॅक्टोबरपासून ऐन दिवाळीत भंगार बाजारावर कारवाईचा हातोडा उगारला.  भंगार व्यावसायिकांचा माल जप्त करण्याचीही कारवाई केली. आता पुन्हा भंगार बाजार वसू नये, होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेने एक फिरते पथक तयार केले आहे. यामध्ये पथकप्रमुख म्हणून अतिक्रमण विभागाचे अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सातपूर विभागातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, विभागीय स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे. सदर पथक कायमस्वरूपी नेमण्यात आले असून, पथकाने दररोज परिसरात फिरून पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे. शिवाय, कुठे अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तत्काळ अतिक्रमण विभागाला द्यायची आहे. पथकाने दररोजचा अहवालही अतिरिक्त आयुक्तांना सादर करायचा असून, कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.