शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

विरोधाचा सूर, तरीही ‘एसपीव्ही’ मंजूर

By admin | Updated: June 17, 2016 00:15 IST

महापालिका महासभा : ‘स्मार्ट सिटी’च्या निवड फेरीत सहभागाचा मार्ग मोकळा

नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत ‘एसपीव्ही’ (स्पेशल परपज व्हेईकल) अर्थात कंपनीकरणातील अनेक मुद्द्यांवर महापालिकेच्या महासभेत सदस्यांनी आक्षेप घेतले. एसपीव्हीच्या रचनेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारांवर होणाऱ्या आक्रमणाबाबत ऊहापोह होत भाजपा वगळता अन्य सर्वच पक्षांच्या सदस्यांनी विरोध नोंदविला. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी एसपीव्हीची चिरफाड करत त्यातील धोके सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सभागृहाचा विरोधाचा सूर असूनही महापौर अशोक मुर्तडक यांनी सूचनांची नोंद घेत ‘एसपीव्ही’च्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या निवड फेरीत सहभागी होण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या निवड फेरीत सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केला जात असून, त्यासाठी ‘एसपीव्ही’चा प्रस्ताव मंजूर होणे आवश्यक होते. महासभेत सदर प्रस्ताव चर्चेसाठी ठेवण्यात आल्यानंतर सुरुवातीलाच भाजपा सदस्यांनी स्मार्ट सिटीसाठी एसपीव्हीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत आपले समर्थन दिले. प्रा. कुणाल वाघ व दिनकर पाटील यांनी ‘स्मार्ट सिटी झालीच पाहिजे’ असा फलकही झळकावला. अजय बोरस्ते, शिवाजी गांगुर्डे, तानाजी जायभावे, राहुल दिवे, शाहू खैरे, शिवाजी शहाणे, सभागृहनेत्या सुरेखा भोसले, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, यशवंत निकुळे आदिंनी स्मार्ट सिटीमुळे होणाऱ्या विकासाला विरोध नसून त्याअंतर्गत होणाऱ्या कंपनीकरणाला आक्षेप असल्याचे स्पष्ट केले. याचवेळी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनीही अभ्यासपूर्ण विवेचन करत एसपीव्हीचे धोके सभागृहाच्या लक्षात आणून दिले. बग्गा यांनी सांगितले, स्मार्ट सिटी होण्याला कुणाचाही विरोध नाही परंतु एसपीव्हीचा प्रस्ताव हा लोकशाहीला घातक आहे. एसपीव्हीच्या कामकाजात गुप्तता असणार आहे. त्याठिकाणी माहितीचा अधिकारही लागू होणार नाही. एसपीव्हीवर जे संचालक राहतील त्यांना शून्य अधिकार असतील. शासनाने नेमलेल्या सनदी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालीच कार्यकारी समिती कामकाज पाहणार आहे. कार्यकारी समितीतील केवळ तीन लोकांना निर्णय घेण्याचे अधिकार राहणार आहेत. महासभेने सुचविलेल्या उपसूचना स्वीकारण्याचे बंधन त्यांच्यावर नसेल. केवळ ७५० कोटींसाठी आपली पारतंत्र्यात जाण्याची तयारी आहे काय, असा सवाल बग्गा यांनी उपस्थित केला आणि पापाचे वाटेकरी होण्यास नकार दिला. यावेळी, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी खुलासा करताना सांगितले, कोणतीही योजना कायद्याला आव्हान देत नसते. स्मार्ट सिटीअंतर्गत होणारी सर्व कामे मनपाच्या संकेतस्थळ, अ‍ॅपवर टाकली जातील. काही विशिष्ट स्तरावर गुप्तता पाळली जाऊ शकते.