शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा : ६० जनावरांना रॅबिजची लागण नऊ जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:08 IST

अंगुलगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने ९ जनावरांचा मृत्यू व ६० जनावरांना रॅबिजची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंगुलगाव येथील ८ गायी व एक बैल रॅबिजच्या आजाराने मरण पावला आहे. साधारण ५० हजार रुपये किमतीची जनावरे दगावली आहे. शेतकरी बांधवाचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे.

येवला : अंगुलगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने ९ जनावरांचा मृत्यू व ६० जनावरांना रॅबिजची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंगुलगाव येथील ८ गायी व एक बैल रॅबिजच्या आजाराने मरण पावला आहे. साधारण ५० हजार रुपये किमतीची जनावरे दगावली आहे. शेतकरी बांधवाचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे.अंगुलगाव परिसरात पिसाळलेल्या कृत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या वेळी जनावरे वस्त्यांवर बाहेर बांधलेली असतात. त्यामुळे जनावरांना चावा घेऊन कुत्री पळून जातात. त्यामुळे जनावरे विचित्र वर्तन करू लागल्याने हा प्रकार लक्षात आला. जनावरे माणसांनादेखील जवळ येऊ देईना. आणि सारखी धाऊ लागल्याने जनावरे रॅबिजची लागण झाल्याचे लक्षात आले. गावातील वस्तीवरील ६० जनावरांना रॅबिज झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०१० मध्ये झोपेतच ७ शेतकºयांना कुत्र्याने चावा घेतला होता. तसेच सध्या जनावरांना मोठ्या प्रमाणात पिसाळलेल्या कुत्र्यांकडून त्रास होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी बांधवांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड यांनी पशुवैद्य डॉ. आर. एस. गोसावी, डॉ. पी. ई. अनर्थे, डॉ. बी. पी. पवार, डॉ. एच. डी. रोकडे, डॉ. आर. सी. पगारे व डॉ.राजेंद्र झाल्टे यांना अंगुलगाव येथील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन तत्काळ ए. आर. व्ही. लसीकरण करण्यास सांगितले. पाचही पशुवैद्यकीय अधिकाºयांना सर्व जनावारांची पाहणी करून जनावरांना रॅबिजची लागण झाली असल्याचे स्पष्ट केले. नाना तुकाराम झाल्टे , बाळु खंडू देवरे, जालिंदर मिच्छंद्र देवरे, नामदेव पुंजा हाळगे, कचरू दुबे, दिगंबर आसाराम देवरे, साहेबराव गंगाधर देवरे, भाऊसाहेब गायकवाड यांच्या गायी, तर गोरख तुळशीराम झाल्टे यांच्या मालकीचा बैल दगावला आहे.