शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाचा प्रसार

By admin | Updated: September 13, 2016 01:33 IST

सोशल मीडियावर मराठा क्रांती मोर्चाचा प्रसार

प्रचाराचे संदेश : शांतता, शिस्त पाळण्याचे आवाहननाशिक : कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातून २४ सप्टेंबरला काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा प्रचार व प्रसारासाठी तसेच मोर्चात सहभागी होताना शिस्तीचे नियम समजावण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. समाजाच्या प्रत्येक नियोजन बैठकीत उपस्थित नागरिकांचे संपर्क क्रमांक घेऊन त्यावर कोर कमिटीकडून देण्यात येणाऱ्या सूचना समाजाच्या अंतिम स्तरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. कोपर्डीतील घेटनेच्या निषेधार्थ काढण्यात येत असलेल्या मोर्चाला सोशल मीडियावर प्रसिद्धी देण्यासाठी ‘एक दिवस माणुसकीसाठी, एक दिवस समाजासाठी’ अशी भावनिक आवाहन करणारी पोस्ट व्हायरल होत असून, यात मोर्चासाठी जनसंपर्क वाढवण्यासोबतच मोर्चात महिलांचा सहभाग वाढविणे, मोर्चाच्या सुरुवातीपासूनच शिस्तीचे पालन करणे, मोर्चामध्ये तंबाखूसेवन व धूम्रपान टाळणे, व्यसन करणारी व्यक्ती आढळल्यास पोलिसांना अथवा स्वयंसेवकांना माहिती देणे, घोषणाबाजी टाळणे व रोखणे, महिला, लहान मुले व वृद्धांना सहकार्य करणे, आक्षेपार्ह वर्तन टाळणे, मोर्चात स्वच्छता ठेवणे, दिसलेला कचरा उचलून कचराकुंडीत टाकणे आदि विविध सूचना फेसबुक व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून व्हायरल केल्या जात असून, मोर्चात कोणत्याही प्रकारे गैरप्रकार घडून नये विविध मार्गांनी जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. यासाठी समाजातील विविध नेत्यांनीही पुढाकार घेतला असून, शहरातील विविध प्रभागांसह जिल्हाभरात गाव, गट तालुका पातळीवर नियोजन बैठका सुरू आहेत. (प्रतिनिधी)