पंचवटी : विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी गोदापार्क येथिल सुयोजित गार्डनवर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या महात्मानगर येथिल क्रिडा प्रशिक्षकावर दोघा संशयितांनी पोटावर, कपाळावर व मानेवर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमाराला उघडकीस आली आहे. या घटनेबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीसांनी दिंडोरीरोडवरील पोकार कॉलनीत राहणाऱ्या समीर कांबळे व आनंदवल्ली येथिल मयूर कडलग अशा दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
क्रिडा प्रशिक्षकावर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: May 5, 2017 15:22 IST