शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे दुमाल्यातील स्पोर्ट कार निघाली अमेरिकेला

By admin | Updated: June 3, 2016 23:59 IST

गोंदे दुमाल्यातील स्पोर्ट कार निघाली अमेरिकेला

बेलगाव कुऱ्हे : मनात जिद्द व आत्मविश्वास असेल तर कोणतेही कार्य अपार मेहनतीच्या बळावर पूर्ण होते, हे सिद्ध करून दाखवलंय गोंदे दुमाला (ता. इगतपुरी) येथील निशांत हरिचंद्र जाधव या २३ वर्षीय विद्यार्थ्याने.निशांतने आपल्या मित्रांच्या मदतीने संशोधन करून स्पोर्ट कार तयार केली असून, अमेरिकेतील स्पर्धेसाठी या कारची निवड झाली आहे. निशांत याने पुणे येथे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना आपल्या मित्रांच्या मदतीने संशोधन करून हॅवाक ६.० स्पोर्ट कार तयार केली आहे. देशांतर्गत विविध स्पर्धांमध्ये निशांतच्या टीमने भाग घेऊन त्यात या स्पोर्ट कारने यश मिळवले आहे. त्यांच्या या कारची निवड अमेरिकेत होणाऱ्या बॅज एसएई इंटरनॅशनल रोचेस्टर २०१६ स्पर्धेसाठी झाली आहे. निशांत आणि त्याची टीम अमेरिकेतील स्पर्धेसाठी रवाना झाली आहे. ९ जून रोजी ही स्पर्धा होणार असून, पूर्वतयारीसाठी आठ दिवस आधिच निशांतची टीम अमेरिकेत पोहचणार आहे. या स्पर्धेसाठी निशांत आणि त्याच्या टीमला सुमारे पन्नास लाख रु पये खर्च आला आहे. या स्पर्धेसाठी कॉलेजकडून अर्धा खर्च केला जाणार असून, अर्धा स्वत: पालकांनी केला आहे. सतत प्रोत्साहन देऊन खंबीरपणे निशांतच्या पाठीशी राहणारे हरिभाऊ जाधव आणि त्यांच्या परिवाराचे परिसरातून कौतुक होत आहे. त्याने दीड वर्षाच्या कालावधीत अथक परिश्रमातून बनवलेली स्पोर्ट कार खरोखरच उल्लेखनीय आहे.गोंदे दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेत शिकलेला एक मुलगा आज संशोधन करून अमेरिकेत यशाचा झेंडा रोवण्यासाठी निघाला आहे. गोंदे दुमाला गावाचे नाव सातासमुद्रापार नेणाऱ्या निशांतचा सर्व गोंदे गावाला अभिमान वाटतो आहे.निशांत अमेरिकेतही यशस्वी व्हावा हीच सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे.