शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
4
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
5
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
6
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
7
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
9
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
10
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
11
Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!
12
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
13
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...
15
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
16
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
17
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
18
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
19
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
20
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई

मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला  उपनगरांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:42 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला सिडको व अंबड भागात बहुतांशी व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली, तर काही भागात सुरू असलेल्या दुकानदारांना मराठा समाजबांधवांनी फिरून शांततेत बंदचे आवाहन केल्याने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र बघावयास मिळाले.

सिडको : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला सिडको व अंबड भागात बहुतांशी व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली, तर काही भागात सुरू असलेल्या दुकानदारांना मराठा समाजबांधवांनी फिरून शांततेत बंदचे आवाहन केल्याने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र बघावयास मिळाले.  सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी राणेनगर येथून फेरीला सुरुवात करण्यात आली. यानंतर फेरी स्वामी विवेकानंदनगर, उत्तमनगर, पवननगर, अंबड लिंक रोडमार्गे शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून सुरू असलेल्या दुकानदार व व्यवसायिकांना बंदचे आवाहन करण्यात आले. नंतर त्रिमूर्ती चौक येथे फेरीचा समारोप करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वैभव देवरे, आशिष हिरे, योगेश गांगुर्डे, विजय पाटील, गणेश अरिंगळे, राजू कदम, मुकेश शेवाळे, अभय पवार, योगेश आहिरे, नाना ठोंबरे, शुभम महाले, समीर सुर्वे, संजय देशमुख, वैभव कोल्हे आदी सहभागी झाले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या पन्नासहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. अंबड गावातून सकल मराठा समाजाच्या वतीने फेरी काढण्यात आली. यानंतर ही फेरी अंबड गाव, एक्सलो पॉइंट, गरवारे पॉइंट मार्गे पाथर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात शहीद झालेल्यांना सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. तर सकल मराठा समाजाच्या काही बांधवांनी उत्तमनगर, उपेंद्रनगर, सहावी योजना या भागातदेखील दुकानदार व व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला. सामाजिक कार्यकर्ते संजय भामरे, विनोद सोनवणे, शशी गरुड, कैलास खांडगे, इकबाल शेख, महेश चव्हाण, सचिन अहिरे, प्रमोद गवळी, राहुल कातोरे, सागर विसे यांनी दुकानदारांना बंदचे आवाहन केले. सिडकोतील मुख्य चौक तसेच गर्दीचे ठिकाण व बस व रिक्षा थांबे येथे बंदमुळे गर्दी तशी कमीच दिसून आली. सिडको व अंबड भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पंचवटी परिसरात संमिश्र प्रतिसादमराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच विविध मागण्यांसाठी मराठा क्र ांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि.२५) पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला पंचवटी परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. वर्दळ असलेल्या परिसरातील दुकाने बंद तर गावठाण परिसरात दैनंदिन व्यवहार पूर्णपणे सुरळीत चालू होते.पंचवटी परिसरात कोणतेही हिंसक वळण लागले नाही. शांततेच्या मार्गाने मराठा समाजबांधवांनी आंदोलन केले. पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, जुना आडगाव नाका, यांसह अन्य परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेली दुकाने बंद होती तर गावठाण भाग असलेल्या ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. परिसरातील अनेक ठिकाणच्या मुख्य चौकाचौकात सकाळपासूनच पोलीस बळ तैनात करण्यात आले होते.सकाळी पावणे अकरा वाजता मराठा क्र ांती मूक मोर्चाच्या वतीने पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मालेगाव स्टॅन्ड, रविवार कारंजा, रेडक्र ॉस, शालिमार आदी भागातून पायी फेरी काढण्यात येऊन दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. यावेळी काही आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शालिमार येथून पायी मोर्चा पुन्हा पंचवटी कारंजा येथे परतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी हमारी मांगे पुरी करो, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी माजी आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नितीन डांगे, सचिन पवार, राजू, देसले, बाळासाहेब उगले, चेतन शेलार, माधवी पाटील, पूजा ढमाल आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा