शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिक मेळाव्याने जागवले आत्मभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:55 IST

जिल्हा साहित्यिक मेळाव्याने प्रारंभापासून नवीन पिढीला वाचनाचे वेड लावत वाचनसंस्कृ ती जोपासण्याचे काम केले असून, या साहित्यिक मेळाव्यांनी विविध साहित्यिकांचे आत्मभान जागवल्याचा सूर ‘साहित्यिक मेळाव्याने काय दिले’ विषयावरील परिसंवादात उमटला. मु. शं औरंगाबादकर सभागृहात सुरू असलेल्या साहित्यिक मेळाव्यातील परिसंवादात गेल्या ५० वर्षांतील विविध साहित्यिक मेळावे अनुभवणाºया साहित्यिकांनी इतिहासातील आठवणींना उजाळा दिला.

नाशिक : जिल्हा साहित्यिक मेळाव्याने प्रारंभापासून नवीन पिढीला वाचनाचे वेड लावत वाचनसंस्कृ ती जोपासण्याचे काम केले असून, या साहित्यिक मेळाव्यांनी विविध साहित्यिकांचे आत्मभान जागवल्याचा सूर ‘साहित्यिक मेळाव्याने काय दिले’ विषयावरील परिसंवादात उमटला. मु. शं औरंगाबादकर सभागृहात सुरू असलेल्या साहित्यिक मेळाव्यातील परिसंवादात गेल्या ५० वर्षांतील विविध साहित्यिक मेळावे अनुभवणाºया साहित्यिकांनी इतिहासातील आठवणींना उजाळा दिला.  सार्वजनिक वाचनालयाने वाचकांचे व साहित्यिकांचेही आचारविचार प्रगल्भ करण्याबरोबरच जगण्याचे आणि लिहिण्याचे आत्मभान जागवल्याचे साहित्यप्रेमी व साहित्यिक मेळाव्याच्या माजी अध्यक्षांनी सांगितले. याच ज्ञानाने अनेकांचे जीवन समृद्ध झाले आहे. यावेळी ना. द. जोशी म्हणाले, मागील ४२ वर्षांपासून अविरतपणे मेळाव्यात सहभागी होतो. या प्रदीर्घ काळात मेळाव्याने विचाररु पी ऊर्जा देत जीवन समृद्ध करण्याचे काम केले आहे. एका पिढीला घडवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका वाचनालयाने निभावली. वाचनालयाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक किस्से सांगितले. साहित्यिक मेळावा अनेकांचा श्वास असून, तो वर्षभर लिहिते, वाचते राहण्याची प्रेरणा देत उत्साह टिकवून ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. नवोदितांना वाचनाची गोडी लावून साहित्याचा जागर मेळाव्यातून झाला आहे. यात अधिक नवोदितांची भर पडण्याची गरज असल्याची अपेक्षा अभिमन्यू सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. कौशल्या भगत म्हणाल्या, पदोपदी ज्ञानोपदेश करत जीवनमार्ग सुखकर करण्याचे काम साहित्यिक मेळाव्याने केले आहे. एखादा वारकरी पंढरीच्या वारीची ज्या आतुरतेने वाट पाहतो, त्याच आतुरनेते आम्ही साहित्यिक मेळाव्याची वाट पाहत असल्याचे अ‍ॅड. मिलिंद चिंधडे यांनी सांगितले. तसेच ‘सावाना जीवन गौरव’ पुरस्काराचा उल्लेख ‘अ. वा. वर्टी सावाना जीवन गौरव’ करण्याची मागणी त्यांनी केली. अरुणा कुलकर्णी आणि संजय गुजराथी यांनी मेळाव्याविषयी आपल्या आठवणी उपस्थिताना सांगत उजाळा दिला.