नाशिक : महापालिका प्रशासनाने नगरसेवकांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देताना स्पीलओव्हर कमी करण्याची अट सत्ताधाºयांना घातली होती. त्यानुसार, स्पीलओव्हर सुमारे २०० कोटी रुपयांनी कमी झाला होता. मात्र, त्याच नगरसेवक निधीमुळे आता स्पीलओव्हर ४५३ कोटी रुपये झाला असून त्यात वाढच होताना दिसून येत आहे.महापौर रंजना भानसी यांनी प्रत्येक नगरसेवकाला ७५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती परंतु, आर्थिक स्थितीचे कारण दर्शवत आयुक्तांनी निधी उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शविली होती. महापौर मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यावेळी आयुक्तांनी अगोदर ६५० कोटींवर गेलेला स्पीलओव्हर कमी करून द्या, मगच निधी उपलब्ध करून देण्याची अट घातली.
मनपाचा स्पीलओव्हर ४५३ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:51 IST