शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२३ लाखांचा खर्च दडविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:35 IST

सटाणा : शहरातील पाणीपुरवठा विहिरीवर करण्यात आलेल्या २३ लाख रुपयांच्या खर्चाची रक्कम सटाणा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत दडविल्याचे उघडकीस आल्याने फिर्यादी अभियंत्यासह अन्य अधिकारी अडचणीत सापडले आहेत. दिलेल्या फिर्यादीत ही लाखोंची रक्कम दडविली गेल्याची तक्र ार पालिकेचे नगरसेवक आरीफ शेख यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

ठळक मुद्दे सटाणा नगरपालिका : फिर्यादी अभियंत्यासह अधिकारी अडचणीत

सटाणा : शहरातील पाणीपुरवठा विहिरीवर करण्यात आलेल्या २३ लाख रुपयांच्या खर्चाची रक्कम सटाणा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत दडविल्याचे उघडकीस आल्याने फिर्यादी अभियंत्यासह अन्य अधिकारी अडचणीत सापडले आहेत. दिलेल्या फिर्यादीत ही लाखोंची रक्कम दडविली गेल्याची तक्र ार पालिकेचे नगरसेवक आरीफ शेख यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा पाणीपुरवठा योजनेंतर्गत गिरणा नदीकाठावर सत्तर लाख रुपये खर्चून विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर २३ लाख रुपये खर्चून या विहिरीचे पुन्हा खोलीकरण करण्यात आले. यानंतर काही महिन्यातच हे बांधकाम ढासळले. या प्रकरणी सटाणा पोलिसांत पालिकेचे अभियंता चेतन विसपुते यांनी सत्तर लाख रु पयांची फसवणूक केल्या प्रकरणी मालेगाव येथील विहीर बांधकामाचे तांत्रिक सल्लागार परशुराम बी. देवरे व त्यांचा मुलगा परेश देवरे \यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वास्तविक ९३ लाख रुपयांची फसवणूक झाली असताना फिर्यादीत २३ लाख रुपयांचा खर्च दडविला गेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत नगरसेवक आरीफ शेख यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकरी राधाकृष्णन बी., सटाणा पोलीस ठाणे यांना लेखी स्वरूपात तक्र ार केल्याने अभियंत्यांसह तत्कालीन मुख्य अधिकारी, तत्कालीन नगराध्यक्ष संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.बनावट अहवालाद्वारे काढली बिले या विहिरीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाºया मालाची शासकीय यंत्रणेमार्फत तपासणी होणे आवश्यक असताना संबंधितांनी धुळे येथील खासगी यंत्रणेमार्फत तपासणी करून त्या तपासणी अहवालावर वेळोवेळी बिले काढली. त्यानंतर विहिरीचे बांधकाम चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे. याबाबत शासकीय यंत्रणा नाशिक यांच्याकडून त्रयस्थ लेखा परीक्षण तपासणी अहवाल प्राप्त करून तो नगरपरिषदेला सादर करणे बंधकारक होते. मात्र हा अहवाल अनुकूल नसल्यामुळे परशुराम देवरे यांचा मुलगा परेश याने त्यांचा कोणताही संबध नसताना परस्पर शासकीय तंत्रनिकेतन नाशिक यांच्याकडील मूळ अहवाल नगरपालिकेस प्राप्त होऊ नये म्हणून दडवून ठेवला व धुळे येथील खासगी संस्थेकडून विहिरीचे झालेले बांधकाम अनुकूल व योग्य असल्याचा बनावट अहवाल प्राप्त करून त्या अहवालाच्या आधारे बिले काढण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.अनामत रक्कम दिलीच कशी ? विहीर बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊनही पालिका प्रशासनाने त्या ठेकेदाराची पूर्ण देयके तर दिलीच, परंतु राजकीय दबाव आणून काही लाखांत असलेली अनामत रक्कम अदा केल्याने संबंधित अधिकारी संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. दरम्यान पालिका प्रशासनाने सत्तर लाख रु पयांचे विहीर बांधकाम केल्यानंतर याच विहिरीच्या खोलीकरणासाठी २३ लाख रु पये मंजूर करून खोलीकरण करण्यात आल्याचे नगरसेवक मुन्ना शेख यांनी सांगितले. विहीर खोलीकरणात २३ लाख रु पयांचा भ्रष्टाचार झाला असताना संबंधित अधिकाऱ्यांनी हे प्रकरण का दडपले, असा सवाल करत याबाबत आपण जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त यांच्याकडे तक्र ार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.