शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या ट्रकने उड्डाणपुलावर घेतला पेट

By admin | Updated: March 17, 2017 01:13 IST

‘बर्निंग ट्रक’ : अग्निशामक दलाच्या जवानांची तत्परता

सिडको : वेळ सुमारे सकाळी सात वाजेची. दिवसाची वाहतूक सुरळीत महामार्गावरून सुरू होती. मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या ट्रकने अचानक राणेनगरजवळ उड्डाणपुलावर पेट घेतला. धावता ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे बघून परिसरातील नागरिकांमध्येही घबराट पसरली होती.राणेनगर येथील उड्डाणपुलावरून ट्रक नाशिकच्या दिशेने येत असताना सकाळी सात वाजेच्या सुमारास ट्रकमधून अचानक धूर येऊ लागला. चालक साव यांच्या हे लक्षात येताच त्यांनी ट्रकची गती हळू करीत ते ट्रकमधून बाहेर पडले. यानंतर काही वेळातच ट्रकने पेट घेतला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुंबईहून नाशिककडे येणारा ट्रक (एमएच ४० वाय ४४६७) उड्डाणपुलावरून राणेनगर येथे आला असता अचानकपणे ट्रकच्या इंजिनमधून धूर येऊ लागल्याचे ट्रकचालक मनोज किशोर साव यांच्या लक्षात आले. चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने ट्रक उड्डाणपुलाच्या संरक्षक कठड्याजवळ उभा केला. या घटनेची माहिती परिसरातील सामाजिक कार्यकते राजू कदम यांनी अंबड पोलीस स्टेशनला व अग्निशामक दलास कळविले. यानंतर अग्निशमक दलाच्या एका बंबाच्या साह्याने काही वेळातच आग विझविण्यात आली. अग्निशामक दलाचे मंगेश पिंपळे, सिद्धार्थ भालेराव, अनिल गांगुर्डे, खोडे, रविकांत लाड आदिंनी आग विझविली. (वार्ताहर)