नायगाव : शिंदे-पाटपिंप्री रस्त्याच्या दुरुस्ती व रूंदीकरणाचे काम संथगतीने होत असल्याचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रसिद्ध करताच संबंधित कंपनीने रविवारी जायगाव येथील पुलाच्या अर्धवट कामाला सुरुवात केल्याने प्रवाशांबरोबर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.निर्मिती कन्स्ट्रक्शन कंपनीने शिंदे- पाटपिंप्री या सोळा किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुरूस्ती व रूंदीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू केले होते. गेल्या काही दिवसांपासून सदर ठेकेदाराने रस्त्याच्या कामाची दुरूस्ती अतिशय कासव गतीने तसेच अधून-मधून व ठिकठिकाणी अर्धवट केलेल्या कामामुळे प्रवाशांबरोबर ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती.रस्ता दुरुतीच्या कामाची मुदत संपूनही काम पूर्ण होत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी उघडी पडल्याने वाहनचालकांना हकनाक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अर्धवट कामामुळे वाहनांच्या नादुरुस्तीचे प्रमाणही वाढले असल्याचे बोलले जात आहे. संथपणे होत असलेल्या कामाबाबत लोकमतन वृत्त प्रसिद्ध केले होते.याच रस्त्यावरील जायगाव येथील कपोता नदीवरील अर्धवट स्थितीत बंद पडलेल्या पुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे अरूंद झालेल्या रस्त्यावरुन प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. हा परिसर अपघातप्रवण बनला आहे. येथील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे लोकमतने शनिवारी वृत्त प्रसिद्ध होताच रविवारी कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.दोन वर्षांपासून सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुदत संपूनही हे काम पूर्ण होत नसल्याने संबंधित कंपनीच्या कामावर ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.- सुनीता सानप,जिल्हा परिषद सदस्य
रस्त्याच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:32 IST
नायगाव : शिंदे-पाटपिंप्री रस्त्याच्या दुरुस्ती व रूंदीकरणाचे काम संथगतीने होत असल्याचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रसिद्ध करताच संबंधित कंपनीने रविवारी जायगाव येथील पुलाच्या अर्धवट कामाला सुरुवात केल्याने प्रवाशांबरोबर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
रस्त्याच्या कामाला गती
ठळक मुद्देनायगाव : शिंदे, पाटपिंप्री येथील ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाल्याने आनंदोत्सवअंतराच्या रस्त्याच्या दुरूस्ती व रूंदीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू केले होते