शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

विशेष शिक्षकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:26 IST

: दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणारे विशेष शिक्षक व परिचर यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

नाशिकरोड : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणारे विशेष शिक्षक व परिचर यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.  दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नाशिक विभागांत सुमारे ५०० व नाशिक जिल्ह्यात १२० विशेष शिक्षक आहेत. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजना केंद्र शासनाच्या १३ एप्रिल व ३१ आॅगस्ट २००९ च्या परिपत्रकानुसार सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत राज्यात ११८५ विशेष शिक्षक व ७२ परिचर यांची सामान्य शिक्षकांच्या  सेवा शर्तीनुसार नियुक्ती करण्यात आली.२७ जुलै २०१५ च्या शासन परिपत्रकानुसार ११८५ विशेष शिक्षक व परिचर यांना कुठलेही कारण नसताना सेवा समाप्त करण्यात आली. या निर्णयाविरोधात विशेष शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती.  औरंगाबाद खंडपीठाने विशेष शिक्षक व परिचर यांचे थकीत वेदन अदा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच विशेष शिक्षक व परिचर यांना पुनर्स्थापित करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनीदेखील शिक्षण विभागाला न्यायालयाच्या निर्णयाचे अनुपालन करण्याची सूचना केली.  धरणे आंदोलनामध्ये मिलिंद साळवे, सागर मेढे, हेमंत पगार, योगेश शिंदे, प्रल्हाद धांडे, योगेश पवार, मनोज निकम, ब्रिजलाल कांदळकर, सोनाली धोंडगे, रत्नमाला परदेशी, प्राजक्ता वाघ, पूनम देवरे आदी सहभागी झाले आहेत.थकीत वेतनाची मागणीअद्यापपर्यंत कर्मचाºयांना पुनर्स्थापित व थकीत वेतन दिलेले नाही. औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, विशेष शिक्षकांना शिक्षण संचालक यांच्या प्रस्तावानुसार अतिरिक्त ठरवून तत्काळ समायोजन करण्यात यावे, थकीत वेतन देण्यात यावे या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गुरुवारपासून दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणाºया विशेष शिक्षक व परिचर यांनी धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे.