नाशिक : राज्यातील वरिष्ठ ३७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या सोमवारी गृह विभागाने बदल्या केल्या़ त्यामध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे यांची विशेष सागरी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर व्हीआयपी सुरक्षा विभागाचे विशेष महानिरीक्षक जयजित सिंह यांची नेमणूक करण्यात आली आहे़ नाशिकचे माजी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना विशेष महानिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही़ नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस निरीक्षकपदी असताना साळुंखे यांच्या कार्यकाळात अहमदनगर जिल्'ातील बहुचर्चित जवखेडा दलित हत्त्याकांड घडले होते़ जमिनीच्या वादातून तिघांचा खून करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे विहिरीत तसेच बोअरवेलमध्ये टाकण्यात आले होते़ या हत्त्याकांडाचा योग्य रीतीने तपास व प्रमुख आरोंपीना अटक करण्यात साळुंखे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती़ लोकसभा निवडणुकीच्या काळात नाशिक परिक्षेत्र (नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर) व मध्य प्रदेश परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (इंदूर) यांच्यासमवेत बॉर्डर मीटिंग घेण्यात आली होती़ महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांतील गुन्हेगार गुन्'ानंतर फरार होण्यासाठी वापर करीत असल्याबाबत तसेच गुन्हेगारांच्या माहितीची आदान-प्रदान करण्यात आले होते़ या बैठकीमुळे लोकसभेच्या निवडणुका पार पडण्याबरोबरच गुन्हेगारीला बहुतांशी आळा बसला होता़ दरम्यान, नूतन महानिरीक्षक जयजित सिंह लवकरच पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे वृत्त आहे़ (प्रतिनिधी)
नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी जयजित सिंह
By admin | Updated: April 14, 2015 00:59 IST