शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दारू पार्टीप्रकरणी संशयितांना पोलीस कोठडीची मागणी : विशेष मोक्का न्यायालय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 22:51 IST

प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी पांगरमल येथे रंगविलेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्यामुळे नऊ मद्यपींचा आठवडाभरात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील सर्व संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र मंगळवारी (दि.१) नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देअहमदगर येथील कारागृहातून सर्व संशयितांना पोलिसांनी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हलविले तब्बल २० संशयितांचा सहभाग पांगरमल येथे झालेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्याने नऊ लोक मृत्युमुखीप्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी पांगरमल येथे रंगविलेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अहमदनगरमधील पांगरमल येथे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये पार पडल्या. यावेळी प्रचाराच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी पांगरमल येथे रंगविलेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्यामुळे नऊ मद्यपींचा आठवडाभरात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील सर्व संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र मंगळवारी (दि.१) नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान सर्व संशयित आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला दिले आहे.पांगरमल येथे झालेल्या ओल्या पार्टीत विषारी दारू प्राशन केल्याने नऊ लोक मृत्युमुखी, तर तेरा जणांना विषबाधा झाली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत गुन्ह्यात सहभागी असणाºया वीस संशयितांना अटक केली होती. यामध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे, मंगला आव्हाड माजी पंचायत समिती सभापती गोविंद मोकाटे यांच्यासह तब्बल २० संशयितांचा सहभाग आहे. भाग्यश्री मोकाटे घटनेपासून फरार असून, गोविंद व मंगला यांना जामीन मंजूर झाला आहे. सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले असून, अहमदगर येथील कारागृहातून सर्व संशयितांना पोलिसांनी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात हलविले आहे. भाग्यश्री मोकाटे अद्याप फरार असून, गुन्हे अन्वेषण विभागापुढे त्यांना अटक करण्याचे आव्हान आहे.  जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करत पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सर्व संशयितांना मिळावी, अशी मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून सर्व संशयितांना बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश दिले असून, यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.