शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या विरोधात बोलणे हा देशद्रोह

By admin | Updated: May 29, 2016 00:17 IST

पर्रिकर : नूतनीकृत सावरकर वाड्याचे लोकार्पण

नाशिक : राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीचा वारसा दिला असून, सावरकरांचा वारसा जपणाऱ्या या देशात देशाविरोधात बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. या देशाचे तुकडे व्हावे, असे कोणाला वाटत असेल तर त्यांना देशद्रोहीच म्हटले पाहिजे, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केले. देशातील नागरिकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर तथा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातून देशप्रेम व राष्ट्रभक्तीसारख्या गुणांचे अनुकरण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सावरकरांचे जन्मस्थळ असलेल्या सावरकर वाड्याच्या नूतनीकृ त इमारतीचे पर्रिकर यांच्या हस्ते शनिवारी (दि.२८) उद्घाटन झाले. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, हेमंत गोडसे, नगराध्यक्ष अनिता करंजकर, माजी मंत्री बबन घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, बाबूराव मोजाड, शिवराम झोले, निवृत्ती जाधव आादि उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र जेएनयूतील देशविरोधी घोषणांच्या प्रकरणावर बोलताना क न्हैया कुमारचा नामोल्लेख टाळत पर्रिकर म्हणाले, या देशाचे तुकडे व्हावे, असे कुणाला वाटत असेल तर त्यांना देशद्रोहीच म्हटले पाहिजे. मत मांडण्याचे स्वातंत्र्य म्हणजे देशाविरोधात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, पर्रिकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाड्यातील सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक हेमंत गोडसे यांनी केले. (प्रतिनिधी)