शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बागलाणमध्ये पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:45 IST

खमताणे : बागलाण तालुक्यात रोहिणी, मृग व आर्द्रा तिन्ही नक्षत्रात मोठा पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धूळवाफेवर बाजरी, भुईमगाची पेरणी केली असली तरी, उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे. बागलाण तालुक्यात केवळ ५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

ठळक मुद्देबळीराजा चिंतित : पावसाची वक्रदृष्टी

खमताणे : बागलाण तालुक्यात रोहिणी, मृग व आर्द्रा तिन्ही नक्षत्रात मोठा पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धूळवाफेवर बाजरी, भुईमगाची पेरणी केली असली तरी, उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे. बागलाण तालुक्यात केवळ ५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.जुलै महिना सुरू होऊन आठवडा झाला तरी पाऊस नसल्याने पेरण्या लांबल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. जमिनीची नांगरणी, वखरणी करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज असला तरी, पाऊस रोजच हुलकावणी देत आहे. गेल्या वर्षी मक्याला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी बहुतांश शेतकरी मका पेरणी करण्यास उत्सुक आहे; मात्र त्यासाठी जमिनीची ओल अधिक असावी लागते; परंतु तसा मोठा पाऊस झाला नसल्याने पेरण्या करण्याच्या मर्यादा पडत आहेत. गेल्या वर्षी पावसाने व शेतमालाच्या अल्प भावाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे; परंतु कर्जकाढून, उसनवार घेत शेतकरी पेरणीसाठी बियाणे, खते खरेदी करीतआहे; मात्र पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या असल्याने शेतकºयांचा धीर सुटू लागला आहे. ज्यांच्याकडे बैलजोडी आहे, ते स्वत: शेतीची मशागत व पेरणी करण्यास प्राधान्य देत असल्याने भाडेतत्त्वावर औत मिळणेही महागडी बाब ठरत आहे. बैलजोडीसह औत याचे दिवसाला हजार रु पये मजुरी झाली असल्याने बैलजोडी नसणाºयाला शेती करणे खर्चीक होणार आहे.