शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

गाळपेरा क्षेत्रावर जनावरांसाठी चारा पेरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 02:04 IST

नाशिक : यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे धरणे, तलाव व अन्य जलाशये झपाट्याने कोरडी होऊ लागली असून, पिण्याच्या पाण्याबरोबरच ...

ठळक मुद्देपाणी, बियाणे मोफत : जिल्ह्यात दोन हजार हेक्टरची सक्ती

नाशिक : यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे धरणे, तलाव व अन्य जलाशये झपाट्याने कोरडी होऊ लागली असून, पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न उभा राहणार असल्याने त्यासाठी आत्तापासूनच तजवीज करण्याची तयारी शासनाने हाती घेतली आहे. त्यासाठी जलाशयांची पाण्याअभावी कोरड्या पडलेल्या गाळपेरा जमिनीवर चारा पेरण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्णात किमान दोन हजार हेक्टर जागेवर अशा प्रकारची पेरणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे.राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर करून त्यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या उपाययोजनांमधून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याबरोबरच, शेतकºयांना दिलासा देण्याच्या योजनांचा समावेश आहे. परंतु नजीकच्या काळात गोधनासाठी चाºयाची अत्यंत निकड भासणार असल्याचे पाहून जलसंपदा, मृदसंधारण विभागांतर्गत येणारी धरणे, तलाव, कालवे, जलाशये पाण्याअभावी कोरडी पडल्याने त्या जागेवर वैरण पिके घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, मका यांसारख्या पिकांचा समावेश असून, त्यासाठी शेतकºयांना गाळपेरा जमीन एक रुपया नाममात्र भाड्याने देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या गाळपेरा जमिनीवर घेण्यात येणाºया वैरण पिकासाठी पाणी मोफत देण्यात येणार आहे. जनावरांसाठी किंवा शिवारातील दूध उत्पादक शेतकºयांनाही विक्री करता येणार आहे. गाळपेºयाची जमीन देताना ज्यांच्या जमिनी तलाव, बंधारे संपादित करण्यात आले आहेत. भूमिहीन, मागासवर्ग, सहकारी संस्थांना ही जमीन देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन हजार हेक्टर गाळपेरा जमिनीवर वैरण पीक घेतले जावे, असे आदेश असले तरी तलाव, बंधारे, जलाशये, पाणथळांची संख्या विचारात घेऊन आवश्यकतेनुसार लागवडीचे क्षेत्र वाढविता येणार आहे. जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समितीवैरण पीक लागवडीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, त्यात कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाºयांना सहभागी करून घेण्यात आले आहे. जिल्ह्यात गाळपेरा जमिनीच्या उपलब्धतेबाबत पाटबंधारे व मृद संधारण विभागाकडून जागेचा तपशील मागविण्यात आला आहे.