शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

साउंड सिस्टीम व्यावसायिकांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 15:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ध्वनिक्षेपक बसविण्याबाबत शासन व पोलिसांकडून केल्या जात असलेल्या दिशाभुलीच्या निषेधार्थ साउंड सिस्टीम ओनर्स वेलफेअर असोसिएशन व प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटनिंग असोसिएशनने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून निवेदन दिले.शहरातील बी. डी. भालेकर मैदानावरून काढण्यात आलेल्या हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी निवासी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ध्वनिक्षेपक बसविण्याबाबत शासन व पोलिसांकडून केल्या जात असलेल्या दिशाभुलीच्या निषेधार्थ साउंड सिस्टीम ओनर्स वेलफेअर असोसिएशन व प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटनिंग असोसिएशनने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून निवेदन दिले.शहरातील बी. डी. भालेकर मैदानावरून काढण्यात आलेल्या हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, नॉइज पोल्युशन अ‍ॅक्ट व सर्वोच्च न्यायालयाने कुठेही ध्वनिक्षेपक यंत्रणा व्यवसाय करण्यास बंदी केलेली नाही, परंतु न्यायालयाच्या निर्देशांचा विपर्यास करून जनतेची व व्यावसायिकांची महाराष्टÑ पोलिसांकडून दिशाभूल केली जात आहे. साउंडचा व्यवसाय बेकायदेशीर असल्याचे तोंडी निर्देश पोलिसांकडून दिले जात असल्यामुळे राज्यातील हजारो साउंड व्यावसायिक व त्यांच्याकडील कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. कोणतेही सार्वजनिक मंडळे या व्यावसायिकांना काम देत नाहीत, त्यामुळे लाखो रुपयांचे कर्ज घेऊन खरेदी करण्यात आलेली सामुग्री पडून आहे. न्यायालयाच्या चौकटीत व्यवसाय करण्यास साउंड सिस्टीमचालक तयार असतानाही डेसीबल रिडिंग चुकीच्या पद्धतीने घेऊन पोलीस व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.कायद्याच्या चौकटीत डेसिबलच्या मर्यादेत ध्वनिक्षेपक लावण्यास किंवा वाजविण्यास आम्ही बांधील असून, या व्यवसायावर बंदी नाही असे सरकारने जाहीर करावे, चुकीच्या पद्धतीने साउंड मोजल्यामुळे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, पोलीस खाते, प्रदूषण महामंडळ यांना साउंड मोजण्याचे, डेसिबल हाताळण्याचे योग्य ते प्रशिक्षण देण्यात यावे, उत्सवाच्या काळात ध्वनी मर्यादेबाबत शिथिलता आणण्यासाठी अध्यादेश काढण्यात यावा आदी मागण्याही मोर्चेकयांनी केल्या आहेत.