शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रामपूर सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपान वायकर

By admin | Updated: May 6, 2017 22:56 IST

सिन्नर : रामपूर (पुतळेवाडी) विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सोपान मच्छिंद्र वायकर तर उपाध्यक्षपदी गोकुळ नारायण नरोडे यांची निवड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यातील रामपूर (पुतळेवाडी) विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी चुरस दिसून आली. दोन्ही पदासाठी उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी पध्दतीने निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी सोपान मच्छिंद्र वायकर तर उपाध्यक्षपदी गोकुळ नारायण नरोडे यांची निवड झाली. संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक गेल्या महिन्यात बिनविरोध पार पडली होती. १३ पैकी संचालक मंडळाच्या १२ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. एक जागा रिक्त राहिली होती. संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक अधिकारी एस. बी. कासार यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेश सभा बोलविण्यात आली होती. अध्यक्षपदासाठी सोपान वायकर व सुधाकर नरोडे तर उपाध्यक्षपदासाठी गोकुळ नरोडे व नवनाथ नरोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निर्धारित वेळेत कोणीही माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी वायकर व नरोडे यांना प्रत्येकी सहा मते मिळाली. त्याचबरोबर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गोकुळ नरोडे व नवनाथ नरोडे यांना प्रत्येकी सहा मते मिळाली. त्यामुळे दोन्ही पदासाठी चिठ्ठी काढून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदाची चिठ्ठी सोपान वायकर तर उपाध्यक्षपदाची चिठ्ठी गोकुुळ नरोडे यांची निघाली. त्यामुळे अध्यक्षपदी सोपान वायकर तर उपाध्यक्षपदी गोकूळ नरोडे यांच्या निवडीची घोषणा निवडणूक अधिकारी कासार यांनी केली. सचिव सुनील कासार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सहाय्य केले. यावेळी संजय नवले, शुक्लेश्वर नरोडे, कल्याबाई डेंगळे, हिराबाई नवले, संतोष खैरनार, रवींद्र खैरनार, उत्तम खैरनार, संजय धारणकर यांच्या सर्व संचालक बैठकीस उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भास्कर नवले, अण्णासाहेब जाधव, साहेबराव खैरनार, संदीप खैरनार, संभाजी नवले, नामदेव नवले, दशरथ खैरनार, गोकुळ पवार, विठ्ठल नवले, आप्पा झिंर्जुडे, भानुदास खिल्लारे, विजय कवडे यांच्यासह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.