शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी प्रकल्पास लवकरच मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:11 IST

उर्ध्वगोदावरी प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याच्या अपूर्ण कामांबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ही माहीती दिली.

येवला : उर्ध्वगोदावरी प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याच्या अपूर्ण कामांबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ही माहीती दिली.विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याच्या अपूर्ण कामांबाबत आमदार जयवंत जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय मांडला होता. त्यावेळी या विषयावर बैठक लावून मार्ग काढण्याचे आश्वासन सभापतींनी दिले होते. त्यामुळे सभापतींच्या दालनात बैठक झाली. यावेळी आमदार जयवंत जाधव, लाभक्षेत्र विभागाचे प्रधान सचिव सी. ए. बिरासदार, गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एच. ए. ढंगारे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अधिकारी गिरीश संघानी, रमेश गावित, राजवेंद्र भट आदी उपस्थित होते. तसेच जि. प. सदस्य संजय बनकर, मोहन शेलार, सचिन कळमकर, बाळासाहेब क्षीरसागर, देविदास शेळके, आमदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, बी. आर. लोंढे आदी उपस्थित होते. सदर बैठकीत आमदार जयवंत जाधव म्हणाले की, चांदवडसह येवला या दुष्काळी तालुक्यांना जलसंजीवनी देणाºया पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव या कालव्याचे उर्वरित काम पूर्ण करण्याची गरज आहे. येवला तालुक्यातील शेतकरी पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पाण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. उर्ध्व गोदावरी प्रकल्पाअंतर्गत पुणेगाव कालवा तसेच दरसवाडी पोहोच कालवा या कामांचा समावेश आहे. सदर प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रकल्प अहवालास लवकरात लवकर मान्यता देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जोड उपसा क्रमांक तीनचे पाणी मांजरपाडा बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात वळविण्याची त्यांनी मागणी केली. दरसवाडी धरणातील ओव्हरफ्लोच्या पाण्याद्वारे पोहोच कालव्याने चांदवड व येवला तालुक्यातील ल.पा.तलाव व पाझर तलाव बंधारे भरण्याचे मूळ प्रकल्प अहवालात नियोजन आहे. त्यामुळे ओव्हरफ्लोच्या पाण्याद्वारे सदर कालव्याची नगरसूलपर्यंत चाचणी घेण्यात यावी अशी मागणी आमदार जाधव यांनी केली. यावेळी बोलताना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच देण्यात येणार असून, सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पातील अपूर्ण राहिलेली कामे हाती घेण्यात येतील. पुणेगावच्या लाभक्षेत्रात पुन्हा पाऊस झाल्यास चाचणीसाठी तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश विजय शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांना दिले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी पुणेगावसाठी अधिकचे पाणी उपलब्ध होऊ शकेल याबाबत चर्चा करण्यासाठी पुन्हा आपल्या दालनात बैठक लावण्यात येणार असल्याचे सांगितले.