शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नवजात शिशु दगावताच मातेने सोडले वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:57 IST

अपत्यप्राप्तीसाठी बहुतांश दाम्पत्यांना अनेकदा संघर्ष करावा लागतो; मात्र नियतीने ज्यांच्या झोळीत अपत्यप्राप्तीचे सुख देते त्यांच्यापैकी अनेकदा काहींना त्याचे गांभीर्य नसल्याचे विविध घटनांमधून समोर येते. शनिवारी (दि.२७) अशीच काहीसी मानवतेला कलंक ठरणारी घटना घडली.

नाशिक : अपत्यप्राप्तीसाठी बहुतांश दाम्पत्यांना अनेकदा संघर्ष करावा लागतो; मात्र नियतीने ज्यांच्या झोळीत अपत्यप्राप्तीचे सुख देते त्यांच्यापैकी अनेकदा काहींना त्याचे गांभीर्य नसल्याचे विविध घटनांमधून समोर येते. शनिवारी (दि.२७) अशीच काहीसी मानवतेला कलंक ठरणारी घटना घडली. एक बाळांतीण मातेचे नवजात शिशु तीन दिवसांनंतर दगावल्याचे लक्षात येताच त्या मातेने बाळाला बेवारस सोडून रुग्णालयातून काहीही न सांगता पोबारा केला.जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी (दि.२५) मोना महेश सपाट (रा.गंगाघाट, पंचवटी) ही गर्भवती महिला प्रसूत झाली. तिने एका गोंडस नवजात बाळाला (मुलगा) जन्म दिला. हे बाळ अवघ्या २६ आठवड्यांचे जन्माला आल्याने अवघे ७०० ग्रॅम इतके वजन होते. गर्भाची नऊ महिने वाढ झाली नसल्याने बाळ अशक्त जन्माला आले. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून बाळावर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले; मात्र बाळ शनिवारी उपचारादरम्यान दगावले. नवजात शिशुचा मृत्यू झाल्याचे समजताच या महिलेने त्या बाळाचा मृतदेह ताब्यात न घेत डॉक्टर, परिचारिका, सुरक्षारक्षक सगळ्यांची नजर चुकवून पळ काढला. ही बाब लक्षात येताच प्रसूती कक्षातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. त्यांनी सुरक्षारक्षकांसह वरिष्ठांना ही बाल निदर्शनास आणून दिली.सुरक्षारक्षकांसह जिल्हा रुग्णालयातील पोलीस कर्मचाºयांनीदेखील महिलेचा परिसरात सर्वत्र शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे नोंद केली असून, पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला. याप्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलWomenमहिला