शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सोनू नवरे या आदिवासी मुलाने मिळवले सुवर्ण पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 18:06 IST

ब्राह्मणगाव : येथील आदिवासी कुटुंबातील बारावी शिक्षण झालेल्या व पुढे परिस्थिती अभावी शिक्षण बंद झालेल्या १८ वर्षाचा सोनू केवळ ...

ठळक मुद्देजम्मू काश्मिर येथे झालेल्या राष्ट्रीय क्र ीडा स्पर्धेत धावण्याच्या स्पर्धेत ग्रामपंचायती वतीने सत्कार

ब्राह्मणगाव : येथील आदिवासी कुटुंबातील बारावी शिक्षण झालेल्या व पुढे परिस्थिती अभावी शिक्षण बंद झालेल्या १८ वर्षाचा सोनू केवळ नवरे या आदिवासी मुलाने १७ नोव्हेंबर रोजी जम्मू काश्मीर येथे रु रल गेम्स आॅर्गनैजेशन आॅफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय क्र ीडा स्पर्धेत ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून प्रथम क्र मांक मिळवला. पाच हजार मीटर स्पर्धा त्याने १२ मिनिट ५८ सेकंदात पार पाडली. आता नेपाल येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्र ीडा स्पर्धा साठी त्याची निवड झाली असून या स्पर्धेसाठी लागणाºया आर्थिक खर्चाची जबाबदारी ग्रामपंचायतीने स्वीकारल्याचे जाहीर करण्यात आले. या सुयशाबद्दल ग्रामपंचायतीचे वतीने त्याचा माजी सरपंच सुभाष अहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य जगदीश अहिरे, विनोद अहिरे, दत्तात्रेय खरे, धर्मा पारखे, ग्रामविकास अधिकारी पी. के. बागुल, अशोक जगताप, बाळा शेवाळे, अतुल खरे व ग्रामस्थ उपस्थित होते.नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत नंतर सोनू नवरे हाही आदिवासी युवक देशात महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्याचे नाव लौकिक मिळवून आल्याने जिल्ह्याला धावण्याच्या स्पर्धेत पुन्हा एक गोल्ड मेडीलिस्त मिळाला आहे.सोनू केवळ नवरे हा आदिवासी कुटुंबातील युवक घरची परिस्थिती आर्थिक हलक्याची आहे. आई, वडील, तीन भाऊ घरची पाच एकर कोरड वाहू शेती असल्याने दुसरीकडे मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवतात. शेतमजुरी करतांना सोनुने धावण्याच्या सराव चालू ठेवला. त्याच्या या चिकाटीमुळे दाभाडी (ता. मालेगाव) येथील धावपटू राकेश खैरनार यांचे मार्गदर्शन मुळे सोनू या स्पर्धेत भाग घेऊन सुवर्ण पदक विजेता झाला आहे. पुढील शिक्षण तो परिस्थिती अभावी घेऊ शकत नाही मात्र यात करियर करण्याचा त्याचा मानस आहे.जम्मू काश्मीर येथे रु रल गेम्स आर निझेशन आॅफ इंडिया चे संस्थापक जनरल सेक्रेटरी मा. थापा यांचे हस्ते सोनूला सुवर्णपदक देण्यात आले आहे.