साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिता सोनवणे यांची, तर उपसरपंचपदी संदीप बोरसे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.साकोरा ग्रामपंचायतीत तीन वर्षांपूर्वी दोन गटांत जोरदार लढत होऊन आठ आणि नऊ असे सदस्य निवडून आले होते. त्यामुळे पहिल्या सरपंचपदाचा मान महिला राखीव म्हणून वैशाली झोडगे यांना केवळ महेंद्र बोरसे यांच्या गटाच्या राजकीय खेळीमुळे मिळाला. त्यानंतर झोडगे यांचा आवर्तननुसार राजीनामा झाला. त्यानंतर महेंद्र बोरसे यांच्या गटातून निवडून आलेल्या आशा बोरसे यांना शिवसेनेचे जि. प. सदस्य रमेश बोरसे यांच्या गटाने गळ टाकून सरपंचपदाचा दुसरा मान मिळवून दिला आणि त्यांना आपल्या गटात सामावून घेतले. आता बोरसे यांचा आवर्तननुसार राजीनाम्यानंतर उर्वरित पंचवीस महिन्यांसाठी आता सरपंचपदासाठी तीन महिला सदस्यांनी चांगलीच कंबर कसली होती.सोमवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी बी.ए. पैठणकर तसेच ग्रामविकास अधिकारी बी.बी. सरोदे तसेच तलाठी कपिल मुत्तेपवार व जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अनिता सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे दुपारी दोन वाजता सोनवणे यांची सरपंच म्हणून घोषणा करण्यात आली. तसेच आवर्तननुसार उपसरपंच अतुल बोरसे यांनी एक महिन्यापूर्वी राजीनामा दिल्यानंतर संदीप बोरसे यांची बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली होती. तेरा सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी ग्रा.पं. सदस्य अतुल बोरसे, संजय सुरसे, दादासाहेब बोरसे, सतीश बोरसे, किरण बोरसे, आशा बोरसे, वैशाली झोडगे, ज्ञानेश्वर मोरे उपस्थित होते.
साकोरा सरपंचपदी सोनवणे, तर उपसरपंचपदी बोरसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:28 IST
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिता सोनवणे यांची, तर उपसरपंचपदी संदीप बोरसे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
साकोरा सरपंचपदी सोनवणे, तर उपसरपंचपदी बोरसे
ठळक मुद्देपंचवीस महिन्यांसाठी आता सरपंचपदासाठी तीन महिला सदस्यांनी चांगलीच कंबर कसली होती.