शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफीची खासगी केंद्रात सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:08 IST

केंद्र शासनाच्या राष्टÑीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत लाभपात्र गर्भवती महिलांसाठी महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा नसल्याने खासगी सेंटरमध्ये असलेली सुविधा वापरून त्याबदल्यात संबंधित सेंटर चालविणाऱ्यांना प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.

नाशिक : केंद्र शासनाच्या राष्टÑीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत लाभपात्र गर्भवती महिलांसाठी महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा नसल्याने खासगी सेंटरमध्ये असलेली सुविधा वापरून त्याबदल्यात संबंधित सेंटर चालविणाऱ्यांना प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.केंद्र शासनाच्या वतीने शहरी भागात राष्टÑीय आरोग्य अभियान राबवले जाते. त्या अंतर्गत गर्भवती महिलांसाठी विविध योजना आहेत. महापालिकेची रुग्णालये आणि प्रसूतिगृहात ज्या सुविधा नाहीत, त्या खासगी व्यावसायिकांमार्फत उपलब्ध करण्याची तरतूददेखील आहेत. महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात सोनोग्राफी केंद्रांची सुविधा उपलब्ध आहे, परंतु अन्य ठिकाणी अशी सुविधा नाही. ज्या ठिकाणी प्रसूतीसाठी महिला जातात त्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व सिडकोतील श्री स्वामी समर्थ रुग्णालय मोरवाडी येथे सोनोग्राफी मशीन मंजूर असून, सध्या ती निविदा कार्यवाहीत आहेत. लवकरच ही सुविधादेखील त्या रुग्णालय व प्रसूतिगृहात उपलब्ध होईल. तथापि, अनेक ठिकाणी अशी सुविधा नसल्याने महापालिकेने खासगी सोनोग्राफी सेंटरची मदत घेतली आहे. त्यासाठी प्रति सोनोग्राफी चारशे रुपयांचा प्रतिपूर्ती खर्च देण्याचीदेखील तयारी आहे. गेल्यावर्षी मनपाने केलेल्या आवाहनाला १५ केंद्रांनी प्रतिसाद दिला होता. पैकी १३ केंद्रांनी नियमित सेवा दिली. आता महापालिकेने आवाहन केल्यानंतर आणखी पाच केंद्रांनी तयारी दर्शविली आहे.अशाच प्रकारे प्रसूतीच्या वेळी महिलांचा रक्तस्राव झाल्यानंतर त्यांना रक्तपुरवठा करण्यासाठी रक्तपेढ्यांची मदत घेऊन त्यांना तीनशे रुपये प्रति रक्तपिशवी देण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी महापालिकेने रक्तपेढ्यांचा शोध सुरू केला आहे.बिटको रुग्णालयात सीटीस्कॅनमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात एमआरआय मशीन व सीटीस्कॅन मशीन खरेदी करण्यासाठी १९ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव येत्या गुरुवारी (दि.२०) होणाºया महासभेत मांडण्यात आला आहे. अर्थात, कुंभमेळ्यापासून हा प्रस्ताव असून वेगवेगळ्या पातळ्यांवर तो अडकत असल्याने आता तरी हा विषय मार्गी लागणार काय याविषयी शंका आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल