शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य रुग्णालयाचे प्रश्न सोडवू

By admin | Updated: July 9, 2017 00:05 IST

मालेगाव : तीन महिलांचा मृत्यू झाला असून, सदर प्रश्न सुटत नसल्याने उद्रेक होईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : येथील सामान्य रुग्णालयात महिला वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपचाराअभावी तीन महिलांचा मृत्यू झाला असून, वारंवार बैठका घेऊनही सदर प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांचा उद्रेक होईल, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.येथील सामान्य रुग्णालयात झालेल्या रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत ग्रामविकास राज्यमंत्री भुसे बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष अजय मोरे होते.रात्री-अपरात्री महिला डॉक्टर नसल्याने उपचार मिळत नाही. सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया न करता खासगी रुग्णालयात रुग्णांना पाठवून शस्त्रक्रिया केल्या जात असल्याबद्दल भुसे यांनी जाब विचारला असता आयसीयू सेटअप नसल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. एप्रिल आणि मे मध्ये ६९ आणि या महिन्यात ५२ शस्त्रक्रिया झाल्या. नर्सिंग कॉलेजसाठी अडीच कोटींची गरज असून, आॅगस्टपासून नर्सिंग कॉलेज सुरू होण्याची शक्यता असल्याचे राज्यमंत्री भुसे यांनी सांगितले. सिटीस्कॅन मंजूर असून ते कार्यान्वित नाही. २ हजार १३१ रुग्णांना सिटीस्कॅनसाठी बाहेर पाठविण्यात आले, तर सोनोग्राफीसाठी रुग्णांना बाहेर पाठविले जात असल्याचे निदर्शनास आले. सामान्य रुग्णालयातील रिक्त पदांसह सर्व प्रश्न संबंधितांकडे पाठवून त्वरित सोडवू, असे आश्वासन भुसे यांनी दिले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांनी रुग्णालयात सिव्हिल सर्जन चिकित्सक, दंत शल्य चिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ यांची पदे रिक्त असल्याचे सांगितले. औषधनिर्माण अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने सदर पदास मान्यता मिळावी अशी विनंती केली. संबंधित वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना उपचारार्थ बाहेर खासगी रुग्णालयात पाठविले जाते. दरम्यान, ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी बैठकीतूनच जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून सामान्य रुग्णालयाचे प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले. वैद्यकीय अधिकारी डॉ. डांगे यांना सामान्य रुग्णालयातील रिक्त पदांसह आवश्यक मागण्यांचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देऊन शासन पातळीवरून समस्या सोडविण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, डॉ. भीमराव त्रिभुवन, प्रमोद शुक्ला, राजेश अलीझाड, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, दत्ता चौधरी आदि उपस्थित होते.