शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील  वीज निर्मिती संच बंदचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:21 IST

राज्य शसनाने एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने द्वारसभा घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

एकलहरे : राज्य शसनाने एकलहरे वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच बंद केल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने द्वारसभा घेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. एकलहरे वीज निर्मिती केंद्र व भुसावळ वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच बंद करण्याबाबत महानिर्मिती, महावितरण व दोन खासगी वीज निर्मिती कंपन्यांमध्ये त्रिपक्षीय करार झाला. त्यानुसार एकलहरे व भुसावळ येथील २१० मेगावॅटचा संच तीन दिवसांपूर्वीच बंद करण्यात आला आहे. त्रिपक्षीय करारामध्ये एकलहरे येथील बंद करण्यात आलेल्या संचाचा कोळसा मे. धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लि. व भुसावळ येथील संचाचा कोळसा मे. आयडीयल एनर्जी प्रोजेक्ट्स लि. यांना देऊन त्या दोन्ही खासगी कंपन्यांकडून महावितरणने वीज खरेदी करावी असे ठरले आहे. सुस्थितीत असलेले संच बंद करून खासगी उद्योगांचा फायदा होण्यासाठी राज्य शासनाकडून सदर चुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. एमईआरसी व एमओडी यांच्या नियमानुसार नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे संच गेल्या दोन वर्षांपासून वीज निर्मितीचे विक्रम मोडत आहे. यामुळे ४.५० रुपये प्रती युनिटपासून ३.२७ रुपये प्रतियुनिट दर झाला आहे. तरीदेखील राज्य शासनाने २१० मेगावॅटचा संच बंद करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांमध्ये प्रचंड संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे.  एकलहरे येथील २१० मेगावॅटचा संच बंद करण्याच्या त्रिपक्षीय कराराचा निषेध करण्यासाठी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या मंगळवारी दुपारी झालेल्या द्वारसभेत कामगार नेते व्ही.टी. पाटल्ीा, विठ्ठल बागल, राजेंद्र लहामगे, अरविंद वाकेकर, सुरेश चौधरी, सीताराम चव्हाण, गजानन सुपे, सुयोग झुटे, सूर्यकांत पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कृती समितीच्या वतीने लवकरच या निर्णयाच्या निषेधार्थ तीव्र लढा उभारण्याचा निर्णय द्वारसभेत एकमताने घेण्यात आला. द्वारसभेला अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार, कामगार उपस्थित होते.खासगीकरणाला चालना?एकलहरे व भुसावळ येथील २१० मेगावॅटचे संच सुस्थितीत असतानासुद्धा राज्य शासनाने ते बंद करण्याचा निर्णय घेऊन त्या संचाचा कोळसा दोन खासगी कंपनींना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या दोन खासगी कंपनीकडून महावितरणने वीज खरेदी करावी, असा त्रिपक्षीय करार झाला आहे. राज्य शासनाचे धोरण खासगी-करणाला चालना देत आहे. सुस्थितीत असलेले संच बंद करून खासगी उद्योगांचा फायदा होण्यासाठी राज्य शासनाकडून सदर चुकीचा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप करीत कामगारांनी या निर्णयास विरोध दर्शविला आहे.  एमईआरसी व एमओडी यांच्या नियमानुसार नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे संच गेल्या दोन वर्षांपासून वीज निर्मितीचे विक्रम मोडत आहे. वीज निर्मिती विक्रमाचे पारितोषिक मिळविणारे केंद्राकडे मात्र शासनाचे वक्रदृष्टी आहे.  ४.५० रुपये प्रति युनिट पासून ३.२७ रुपये प्रति युनिट दर झाला आहे. तरीदेखील राज्य शासनाने २१० मेगावॅटचा संच बंद करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांमध्ये प्रचंड संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :electricityवीज