शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

ब्राह्मणवाडेत राष्ट्रीयीकृत बॅँक सुरू झाल्याने समाधान

By admin | Updated: February 18, 2016 23:02 IST

ब्राह्मणवाडेत राष्ट्रीयीकृत बॅँक सुरू झाल्याने समाधान

नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे युनियन बॅँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बॅँकेची शाखा सुरू झाल्याने शेतकरी व ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. नायगाव खोऱ्यात युनियन बॅँक ही एकमेव राष्ट्रीयीकृत बॅँक असून, तिची शाखा नायगाव येथे आहे. या शाखेत नायगावसह जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सोनगिरी, जोगलटेंभी व निफाड तालुक्यातील सावळी, पिंपळगाव निपाणी आदि गावांतील ग्राहकांची येथे नेहमीच गर्दी होत असते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. ग्राहकांची ही गैरसोय टाळण्यासाठी ब्राह्मणवाडे येथे युनियन बॅँकेची शाखा सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन ब्राह्मणवाडेत युनियन बॅँकेची शाखा सुरू करण्यात आली आहे. बॅँकेचे क्षेत्रीय प्रबंधक दीपक कांबळे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. नायगाव खोऱ्याच्या विकासात्स्रा युनियन बॅँकेचा मोलाचा वाटा असल्याचे गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे यांनी सांगितले. ग्राहकांना बॅँकिंग व्यवहारासाठीच्या सर्व सुविधा शाखेतच उपलब्ध करून देण्याची मागणी गोदा युनियनचे माजी संचालक रामदास बोडके, सरपंच सुनील गिते, पोपट आव्हाड यांनी केली. यावेळी ग्राहकांना एटीएम कार्ड व कर्ज धनादेश वितरित करण्यात आले. याप्रसंगी बरकत सोहील, पी. डी. गिते, देवराम गिते, कैलास गिते, गोदा युनियनचे संचालक मीननाथ कातकाडे, संतू पानसरे, कैलास गिते, दगू दिघोळे, दिलीप घुगे, भाऊसाहेब रामराजे, तबाजी वाघ, संतोष घोलप, संतोष गिते आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाखा अधिकारी एस. बी. पाडवी यांनी आभार मानले. (वार्ताहर)