शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापूर्वीच्या सूर्यवंशी खुनाची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:11 IST

: गतवर्षी १९ आॅक्टोबर २०१६ रोजी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील गोदापात्रात मृतदेह आढळून आलेल्या आकाश बाळू सूर्यवंशी (२२, रा़दुर्गानगर, पंचवटी) या युवकाच्या खुनाची उकल करण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश आले आहे़ विशेष म्हणजे अहमदनगरच्या कुविख्यात चन्या बेग टोळीतील सराईत गुन्हेगारासह अशोकनगरमधील एका संशयिताचा यामध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे़

नाशिक : गतवर्षी १९ आॅक्टोबर २०१६ रोजी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील गोदापात्रात मृतदेह आढळून आलेल्या आकाश बाळू सूर्यवंशी (२२, रा़दुर्गानगर, पंचवटी) या युवकाच्या खुनाची उकल करण्यात शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश आले आहे़ विशेष म्हणजे अहमदनगरच्या कुविख्यात चन्या बेग टोळीतील सराईत गुन्हेगारासह अशोकनगरमधील एका संशयिताचा यामध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी पोलिसांनी संशयित निखिल संतोष गवळी (२५, सातपूर) यास अटक केली आहे़  अहमदनगरच्या चन्या बेग टोळीतील शार्पशूटर शाहरूख रज्जाक शेख (२५, रा़ खैरी निमगाव, ता़श्रीरामपूर, जि़अहमदनगर), सागर सोना पगारे (२२) व बारकू सुदाम आंभोरे (२१, दोघे रा. चितळी, ता़राहाता, जि़ अहमदनगर) यांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी रविवारी (दि़२२) इंदिरानगर, आनंदनगरमधील पार्वती अपार्टमेंटमधून सापळा रचून पकडले होते़ या तिघांकडून दोन गावठी पिस्टल, ४० काडतुसे, पाच मोबाइल व एक यामाहा दुचाकी असा ३ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता़  नगरच्या बेग टोळीतील सराईतांनी शहरात काही गुन्हे केले आहेत का याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर करीत होते़ पोलीस शिपाई योगेश सानप यांना शाहरुख शेख याने शहरातील गुन्हेगारांसोबत गंगापूर येथे युवकाचा खून केल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी तपास करून सातपूर अशोकनगरमधून निखील गवळी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता पंचवटीतील आकाश सूर्यवंशी या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून त्याचा मृतदेह गोदापात्रात फेकल्याची कबुली त्याने दिली. तसेच हा खून आपले दोन साथीदार, शाहरुख शेख व त्याच्या एक मित्र अशा पाच जणांनी मिळून केल्याचे सांगितले़ किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली व त्यातून आकाशचा खून केल्याचे गवळीने पोलिसांना सांगितले़  सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, पोलीस शिपाई योगेश सानप, बाळा नांद्रे यांनी ही कामगिरी केली़  दरम्यान, बेग टोळीने शहरातील आणखी काही गुन्हे केले आहेत का? त्याचे लोकप्रतिनिधी, सराईत गुन्हेगार यांच्याबरोबरच संबंध होते का? आर्थिक साहाय्य कोण करीत होते याचा पोलीस शोध घेत आहेत़