शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शंभर गावांचा पाणीपुरवठा सुरळीत

By admin | Updated: December 10, 2015 00:01 IST

तोडगा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा संप मागे

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सुमारे शंभरहून अधिक गावांचा बंद करण्यात आलेला पाणीपुरवठा काल (दि. ९) सुरळीत सुरू झाला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मंगळवारी रात्री उशिरा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संघटना संयुक्त समितीने बेमुदत संप मागे घेतला.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सोमवारपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या आवारात दोन दिवसांपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले होते. या बेमुदत संपामुळे मालेगाव तालुक्यातील ५०, चांदवड तालुक्यातील ५०, सिन्नर तालुक्यातील पाच, ओझर साकोरे तीन गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अशा १०८ गावांचा, तसेच इगतपुरी शहर पाणीपुरवठा योजना व ओझर येथील संरक्षण केंद्र पाणीपुरवठा योजना या दोन शहरी अशा एकूण ११० योजनांचा पाणीपुरवठा या बेमुदत संपामुळे रविवारी मध्यरात्रीपासून खंडित झाल्याने शंभरहून अधिक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शासनात विलीनीकरण करून विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन व निर्वाह भत्ते सरकारने (पान ७ वर)करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीच्या वतीने हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या धोरणानुसार पाणीपुरवठा व जलनिस्सारण योजनांवरील प्रत्यक्ष खर्चाच्या अनुषंगाने आस्थापना, हत्यारे व अवजारे यांच्या खर्चापोटी १७.५ टक्के इतके ई अ‍ॅन्ड पी शुल्क आकारणे अनिवार्य असून, ते मजीप्राच्या उत्पन्नाशी निगडित आहे. या शुल्कातून मजीप्राच्या कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यापोटीचा खर्च भागविला जातो. कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याच्या खर्चासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जात नाही. २२ फेब्रुवारी २०११ च्या शासन निर्णयानुसार ई अ‍ॅन्ड पी शुल्क १७.५ टक्के ऐवजी ५ ते ९ टक्केपर्यंत कमी करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व निवृत्तीवेतनाचा खर्च कसा भागवावा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर अधिवेशनानंतर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेला दिल्याने बेमुदत संप मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)