शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाजनपूर येथे बिबट्या जेरबंद नागरिकांमध्ये समाधान : तीन दिवसांत दुसरा बिबट्या पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 18:55 IST

सायखेडा : महाजनपूर शिवारात तीन दिवसांपूर्वी वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या पकडल्याची घटना ताजी असताना गुरुवारी दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी लावलेल्या पिंजºयात पुन्हा दुसरा बिबट्या अलगद आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर आणखी बिबट्या असल्याचा संशय असल्याने वनविभागाने तिसरा पिंजरा लावला आहे.

सायखेडा : महाजनपूर शिवारात तीन दिवसांपूर्वी वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या पकडल्याची घटना ताजी असताना गुरुवारी दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी लावलेल्या पिंजºयात पुन्हा दुसरा बिबट्या अलगद आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर आणखी बिबट्या असल्याचा संशय असल्याने वनविभागाने तिसरा पिंजरा लावला आहे.वन क्षेत्र कमी झाल्याने भक्षाच्या शोधात बिबट्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. गोदाकाठ भागात गोदावरीचे खोरे असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे लपण्यासाठी बिबट्या सातत्याने येतो; मात्र महाजनपूर, तळवाडे, भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी या शिवारात सातत्याने दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र नाही, शिवाय टेकडी, डोंगर, दाट झाडी असे कोणतेही क्षेत्र बिबट्याला लपण्यासाठी नसल्याने बिबट्या या भागात आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे.नाशिक महानगरपालिका, सिन्नर नगर परिषद आपल्या शहरी भागातील मोकाट कुत्रे पकडून या भागात सोडतात. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर, शेतात फिरताना दिसतात. बिबट्याला इतर ठिकाणी भक्ष मिळत नसल्याने कुत्र्यांच्या मागोव्याने या भागात सातत्याने येत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगामातील पिकांची कामे शेतात सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतकºयांना शेतात जावे लागते. तीन दिवसांत दुसरा बिबट्या पकडला असून, आणखी एक असल्याचा संशय असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. वनविभागाच्या अधिकाºयांनी बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा. पकडलेले बिबटे परत पुन्हा या भागात सोडले जात असल्याचा दावा केला जात आहे, तरी या भागात बिबटे सोडू नये अन्यथा गावातील नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा सरपंच आशा बचवंत फड यांनी दिला आहे. त्यानंतर येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारे, कर्मचारी भैया शेख, विजय टेकनर यांनी पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला निफाडच्या वनविभागाच्या रोपवाटिकेत नेल्याचे समजते.

टॅग्स :Tigerवाघ