शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाच टक्के भरून मिळणार सौर कृषिपंप

By admin | Updated: May 20, 2015 23:47 IST

राज्याला ७,५४० पंपांचे उद्दिष्ट : साडेचारशे कोटींची तरतूद

नाशिक : केंद्र सरकारने पर्यावरणपूरक अपारंपरिक ऊर्जास्रोतांना बळकटी देण्याचे धोरण आखले असून, त्यानुसार देशात राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांना अवघी पाच टक्के रक्कम भरून सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला ४,७५० नग सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येणार असून, या पंपांच्या ५ टक्के रकमेची म्हणजे सुमारे ४४५ कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारला करावी लागणार आहे.उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. त्यानुसार केंद्र सरकार राष्ट्रीय पातळीवर एक लाख सौर कृषिपंप वितरीत करणार असून, महाराष्ट्र राज्याला त्यातील ४,७५० कृषिपंप मिळणार आहेत. सौर कृषिपंपांच्या एकूण रकमेपैकी केवळ पाच टक्के रक्कम शेतकरी लाभार्थ्यांना, तर पाच टक्के रक्कम राज्य सरकारला भरावी लागणार असून, ३० टक्के वाटा हा केंद्र सरकार उचलणार आहे. तसेच उर्वरित ६० टक्के रक्कम कर्ज काढावे लागणार आहे. ३ अश्वशक्तीच्या सौर कृषिपंपाची किंमत ३ लाख २४ हजार इतकी असून, शेतकऱ्यांना या रकमेच्या ५ टक्के म्हणजेच १६ हजार २०० रुपये रक्कम भरावी लागणार असून, तितकीच रक्कम राज्य सरकार भरणार आहे. केंद्र सरकार ९७ हजार २०० रुपये (३० टक्के रक्कम) भरणार असून उर्वरित १ लाख ९४ हजार ४०० रुपये लाभार्थ्यांना कर्ज घ्यावे लागणार आहे. या योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषात राज्यातील अकोेला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांतील आत्महत्त्याग्रस्त शेतकरी, शासनाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, राज्यातील पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या गावांतील शेतकरी, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्या भागांतील शेतकरी, महावितरण कंपनीकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांपैकी ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे नजीकच्या काळात वीजपुरवठा शक्य नाही ते शेतकरी, तसेच लाभार्थी शेतकऱ्यांचे क्षेत्र पाच एकरपेक्षा जास्त असू नये, यांसह अन्य निकष या योजनेत सहभागी असण्यासाठी टाकण्यात आले आहेत. या योजनेनुसार शेतकऱ्यांना सौर कृषीपंपांच्या एकूण किमतीच्या पाच टक्के रक्कम भरून ३ अश्वशक्ती ए.सी. पंप व ३ अश्वशक्ती डी.सी. पंप, ५ अश्वशक्ती ए.सी.पंप व ५ अश्वशक्ती डी.सी.पंप त्याचप्रमाणे ७ अश्वशक्ती ए.सी. पंप सौर कृषीपंप घेता येतील.(प्रतिनिधी)