शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा उपयुक्त

By admin | Updated: November 4, 2015 22:43 IST

रामचंद्र भोगले : चेंबरतर्फे आयोजित कार्यशाळेत प्रतिपादन

नाशिक : दिवसेंदिवस विजेचा वापर वाढत असून, त्या तुलनेत विजेची निर्मिती होत नसल्याने मागणी व पुरवठा यांचा समन्वय साधला जात नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा आणि पंपाचा वापर सोयीचा आणि वरदान ठरू शकेल, असे मत महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर यांच्या वतीने अशोका सभागृहात सौरपंप आणि पी. व्ही. पॅनल याविषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. खासदार हेमंत गोडसे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता बी. जी. जाधव, एम.एस.ई.डी.सी.एल.चे मुख्य अभियंता व्ही. बी. बढे, चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, चेंबरच्या अपारंपरिक ऊर्जा समितीचे अध्यक्ष यू. के. शर्मा आणि उपाध्यक्ष विलास शिरोरे यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात विजेची बचत होऊ शकते. हीच वीज अन्यत्र वापरली जाईल. विजेचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम उद्योजकांवर होत असतो. शेतकऱ्यांना देण्यात येणारी वीज बिल माफी किंवा वीज बिलातील सवलत भरून काढण्यासाठी उद्योजकांवरच अधिभार लावला जातो. त्यामुळे उद्योजकांना महाग दराने वीज घ्यावी लागते. त्यामुळे यावर मात करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे, असेही भोगले म्हणाले. विलास शिरोरे यांनी प्रास्ताविक, तर निता आरोरा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ममता पाटील, अश्विनी बोरस्ते, योगीता अहेर, तसेच चेंबरचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)