शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

समाजसेवींचा निर्मला पुरस्काराने सन्मान

By admin | Updated: August 9, 2015 23:18 IST

निर्मला लोककल्याण प्रबोधिनी : नि:स्वार्थ सेवाभाव जोपासण्याची प्रेरणा

नाशिक : नि:स्वार्थपणे सेवाभाव जोपासून समाजसेवेत अग्रेसर असणाऱ्या समाजसेवींना ‘निर्मला पुरस्कार-२०१५’ देऊन सन्मानित करण्यात आले.समाजातील गोरगरीब आदिवासी जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या निर्मला लोककल्याण प्रबोधिनीच्या वतीने ‘निर्मला पुरस्कार-२०१५’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्लब सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक मुर्तडक, डॉ. मधुसुदन झवर, डॉ. शरद पाटील, सरोज दायमा, डॉ. प्रशांत बिर्ला, डॉ. आसिफ तांबोळी आदि मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे यांनी केले.समाजातील गरजूंची सेवा करण्यासाठी पैशाची श्रीमंती नव्हे तर मनाची श्रीमंती आवश्यक असते. सामाजिक बांधीलकीची जोपासना करत समाजाचे ऋण फेडण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे यावेळी अशोक मुर्तडक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. १९९१ सालापासून संस्था कार्यरत असून, वैद्यकीय सेवेबरोबरच आरोग्यविषयक जनजागृती करण्यावर संस्थेने भर दिला आहे. याअंतर्गत संस्थेने विविध उपक्रम राबविले असल्याची माहिती झवर यांनी यावेळी दिली.यावेळी डॉ. भानुदास डेरे (ग्रामीण शिक्षण व प्रबोधन), डॉ. विजय बिडकर (आरोग्य सेवा आदिवासी क्षेत्र), डॉ. आरती काबरा (आरोग्यसेवा), बाळकृष्ण पागेरे (शिक्षणसेवा), सुमती नावरेकर (कुष्ठरोग सेवा) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मापत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक देवरे यांनी केले व जयंत ठोमरे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)