शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

प्रोत्साहनासाठी सोशल माध्यम आघाडीवर

By admin | Updated: February 22, 2017 01:32 IST

नोटा नको, कधीही बदलल्या जातील : नगरसेवक निवडताय, जावई नाही

नाशिक : जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक होत असून, मतदारांनी लोकशाही जागृत ठेवण्याबरोबरच सक्षम व प्रामाणिक उमेदवार निवडण्यासाठी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी शासनस्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांना सोशल माध्यमानेही मंगळवारी जोरदार हातभार लावला. मतदारांमध्ये मतदान जागृतीसाठी कधी बोचरी टीका, तर कुठे आपल्या हक्काबाबत जाणीव करून देण्यात या माध्यमाचा वापर प्रभावी ठरला, परिणामी मतदान केल्यानंतर स्वत:ची सेल्फी काढणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली.  मतदारांनी आपला हक्क बजवावा यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने गेल्या महिनाभरापासून जोरदार प्रयत्न चालविले होते. त्यासाठी सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत, अभिनेता चिन्मय उदगिरकर, मिस युनिर्व्हस नम्रता कोहोक यांचा दूत म्हणून नेमतानाच अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून जागृती करण्यात येत होती.  परिणामी मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग मंगळवारी मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगांमुळे स्पष्ट झाला. परंतु यात सर्वाधिक हातभार सोशल माध्यमाचा लागला. व्हॉट्स अप, फेसबुक, ट्विटर, टेलिग्रामच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी कविता, स्लोगन, चित्रपटातील संवादाचा खुबीने वापर करण्यात आला. जाती-पातीचा वापर मतदानात होऊ नये म्हणून ‘जात बघून मतदान करू नका, तुम्ही नगरसेवक निवडताय जावई नाही’ अशा पद्धतीने जाती-पातीवर टीका करण्यात आली आहे तर तुमचे मतदान किती किमती आहे हे समजावून सांगताना ‘अगर आपकी उंगली पर छोटा सा दाग लगने से अच्छे लोगों की सरकार बनती हैं तो समझ लो की ‘दाग अच्छे हैं’ असेही समजावून सांगण्यात आले. मतदाराला प्रलोभनापासून दूर ठेवण्यासाठी ‘पैशाकडे बघून कधीच मतदान करू नका, मोदी कधी नोटा बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही’ अशी खिल्लीही उडविण्यात आली आहे.  मतदारांमध्ये उत्सुकता वाढीस लागावी म्हणून, ‘हा मॅसेज फक्त १८ वर्षावरील व्यक्तींनीच वाचावा... मतदान जरूर करा, हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यसुद्धा’ अशाप्रकारे जाणीव करून देण्यात आली. त्याचप्रमाणे, ‘घरात तुमच्या मताला फार महत्त्व दिले नसेल तरी निवडणुकीत तुमच्या मताला फार महत्त्व आहे’ असे सांगतानाच, त्यातून राजकीय टीकाही साधण्यात नेटिझन कमी पडले नाहीत. ‘कुछ तो खासियत हैं मेरे वोट में, वोट देता हूॅँ फकिरोंको, कमबख्त शहंशाह बन जाते हैं’ असे म्हणून भ्रष्ट राजकारण्यांची टोपी उडविण्यात आली. ‘उठा उठा सकाळ झाली, मतदान करण्याची वेळ झाली’ असे भल्या पहाटेच आवाहन करतानाच, ‘आजचा दिवस आपला, मतदान दिवस, सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा.  कार्यकुशल व चांगल्या, स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला मतदान करा व आपले कर्तव्य पार पाडा’ असेही मतदारांना बजावण्यात आले. मतदानासाठी आग्रह धरताना चित्रपटांच्या नावांचा उपयोग करून काहींनी कल्पकता लढविली, त्यात म्हटले...‘ प्रचारातील आश्वासनांना बळी पडून सैराट होऊ नका, आश्वासनांचे फुगे उडतच राहतील. कोणत्याही पार्टीचे विचार करताना सध्या ती काय करते हे पाहण्यापेक्षा तिने माझ्यासाठी काय केले अथवा ती माझ्यासाठी काय करू शकते याचा विचार करा आणि मगच आपलं मत द्या. (प्रतिनिधी)