शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात सामाजिक वनीकरण विभागाने केली १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 19:42 IST

येवला : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात करंज, रेनट्री, निम, आवळा, चिंच, वड, पिंपळ, हादगा, शेवगा, जांभूळ, सिल्वर, ओक, विलायती चिंच, सिताफळ, आधी वृक्षांची लागवड झाली आहे. सदर वृक्ष खिर्डी साठे व राजापूर येथील शासकीय रोप रोपवाटिकेतून वृक्ष आणण्यात आले आहे.

ठळक मुद्देबावन ग्रामपंचायतीना एक लाख ६६ हजार वृक्ष देण्यात आले.

येवला : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.यात करंज, रेनट्री, निम, आवळा, चिंच, वड, पिंपळ, हादगा, शेवगा, जांभूळ, सिल्वर, ओक, विलायती चिंच, सिताफळ, आधी वृक्षांची लागवड झाली आहे. सदर वृक्ष खिर्डी साठे व राजापूर येथील शासकीय रोप रोपवाटिकेतून वृक्ष आणण्यात आले आहे.कोटमगाव येथे आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते तर पांजरवाडी येथे आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. भारम येथे वृक्ष लागवड पंचायत समिती सदस्य लक्ष्मीबाई गरु ड यांच्या हस्त, अंकाई येथे डॉ. सुधीर जाधव यांच्या हस्ते झाले. या वृक्षांची देखरेख तीन वर्षांपर्यंत करणे. कुंपण, पाणी, संरक्षण तेथील व सुरक्षतेसाठी सर्व उपाय योजना करण्यात येतात. त्यासाठी सदर वृक्षांची देखभाल करण्यासाठी या ठिकाणी वन मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी सामाजिक वनीकरण विभागाने येवला तालुक्यातील बावन ग्रामपंचायतीना एक लाख ६६ हजार वृक्ष देण्यात आले.महाराष्ट्र राज्य योजनेअंतर्गत महत्वाचे रस्ते, कालवे, रेल्वे महामार्ग आदी बाजूला वृक्षांची लागवड करण्यात येते. या योजनेतून सदरचा खर्च भागविण्यात येतो. गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना खिर्डीसाठे येथील रोपवाटिकेत कोपरगाव येथून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.नाशिक वन विभागाकरिता ८८ लाख, सामाजिक वनीकरण २५ लाख, वन विकास महामंडळ १४ लाख ३४ हजार, ग्रामपंचायत विभाग ४२ लाख २३ हजार वृक्षांची उद्दिष्टे देण्यात आली होती. येवला तालुक्यात सामाजिक वनीकरण विभाग एक लाख ९७ हजार वृक्षांची लागवड जुलै अखेर करावयाची आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.पांजरवाडी गट लागवड १० हजार, भारम २५ हजार, बाभूळगाव ते पाटोदा रस्ता ५ हजार, सावरगाव ते येवला ५ हजार,कोटमगाव ते गवंडगाव ५ हजार, अंगणगाव ते देशमाने ५ हजार, नगरसुल ते धामोडे ३ हजार, कौठ खेडे ते नागडे ५ हजार, नगरसुल ते ममदापुर ५ हजार, कौठ खेडे ते भारम रहाडी पर्यंत ५ हजार, वाई बोथी ते अंदरसुल ५ हजार, नगरसुल ते खिडीसाठे २ हजार, सावरगाव ते पाटोदा ५ हजार, वाई बोथी ते न्याहारखेडा एक हजार, या प्रमाणे रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.