नाशिक : देशात भ्रष्टाचार वाढत चालला आहे. हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी महिलांनी केवळ टीव्हीवरील मालिका न बघता राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. स्त्री-पुरु षांमध्ये भेदभाव न करता त्यांना समान अधिकार दिला पाहिजे. पुरु षांना सातच्या आत घरात बसविल्याशिवाय बलात्कार थांबणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.स्वयंम फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रावसाहेब थोरात सभागृहात स्वयंसिध्दा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी दमानिया बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील उद्योजिका पिनल वानखडे, धन्वंतरी महाविद्यालयाच्या संस्थापिका सरोज धुमणे- पाटील, स्वयंम फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा बागुल उपस्थित होत्या.याप्रसंगी दमानिया म्हणाल्या की, प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिला आजही राजकीय क्षेत्राविषयी उदासीन दिसतात. यामुळे देशात भ्रष्टाचार दिवसेंदिवस वाढतो आहे. बोकाळणाऱ्या भ्रष्टाचाराला वेळीच लगाम घालण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन राजकीय क्षेत्रात येण्याचे आवाहन त्यांनी केले. यासाठी टीव्हीवरील दैनंदिन मालिकांमध्ये न रमता बातम्या, व्यापार, उद्योग आणि राजकीय विषयांवर घरातील व्यक्तींशी चर्चा करायला हवी, असे आवाहन त्यांनी केले. उद्योजिका वानखडे यांनी रोटरी क्लबच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी डॉ. प्राची पवार (वैद्यकीय सेवा), डॉ. अपर्णा फरांदे (उद्योजिका), न्या. सुचित्रा घोडके, सुरश्री दशकर (संगीत), वैशाली बालाजीवाले (पत्रकार), मीना निकम- परु ळेकर (गायिका), स्वराली देवळीकर (मिस महाराष्ट्र), आरती पाटील (खेळाडू), ललिता शिंदे (सामाजिक कार्यकर्त्या) या महिलांचा स्वयंसिध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक मनीषा बागुल यांनी केले. सूत्रसंचालन भैरवी कुलकर्णी यांनी केले.
...तर पुरुषांना सातच्या आत घरात बसवा!
By admin | Updated: March 9, 2017 02:04 IST