शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारात शिजला साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:01 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील अंगणवाडीमार्फत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात चक्क साप शिजला गेल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, खबरदारी म्हणून दोन बालके व एका मातेला उपचारार्थ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतळेगाव येथील अंगणवाडीतील प्रकार : दोन बालके, माता रु ग्णालयात

तळेगाव येथे पोषण आहारात आढळलेला मृत साप.

 

 

घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील अंगणवाडीमार्फत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात चक्क साप शिजला गेल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, खबरदारी म्हणून दोन बालके व एका मातेला उपचारार्थ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी भरविण्यात येते. या अंगणवाडीत पंधरा बालके असून, त्यांना पोषण आहार दिला जातो. गुरुवारी सकाळी या अंगणवाडीत बालकांना तांदळाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले.या बालकाच्या मातांनी हा पोषण आहार घरी नेऊन बालकांना भरविला; मात्र यातील सुरेश कुंदे यांच्या मुलीला देण्यात आलेल्या पोषण आहारात चक्क साप शिजविला असल्याचे दिसून आले. याबाबतची कल्पना श्रमजीवी संघटनेचे तानाजी कुंदे यांना समजताच त्यांनी पंचायत समितीला कळविले. दरम्यान, या प्रकारानंतर पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले असून, प्रकल्प अधिकाºयांनी अंगणवाडीला भेट दिली. तसेच खबरदारी म्हणून शुभांगी सुरेश कुंदे (९ महिने), संजना प्रदीप वर्मा (५) व एक माता शीतल सुरेश कुंदे याना तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे.दरम्यान, या अंगणवाडीची सेविका मुंबई येथे वास्तव्यास असून, गेल्या काही महिन्यांपासून ती या अंगणवाडीत गैरहजर असल्याची बाब समोर आली आहे.दरम्यान, या घटनेचीचौकशी करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे, तालुकाध्यक्ष संजय शिंदे, संतोष ठोंबरे यांनी केली आहे.इमारत नसल्याने उघड्यावरच भरते अंगणवाडीतळेगाव येथील अंगणवाडीसाठी इमारत नसल्याने अंगणवाडी उघड्यावर भरविण्यात येते. गुरुवारी सकाळी मिळालेला पोषण आहार माझी पत्नी घरी घेऊन आली. माझी सहा महिन्यांची मुलगी झोपली होती. हा आणलेला पोषण आहारातील काही भाग माझ्या पत्नीने खाल्ला आणि उर्वरित पोषण आहार माझी मुलगी झोपेतून उठल्यावर तिला खाऊ घालत असताना या पोषण आहारात मृत साप दिसून आल्याचे पालकांनी सांगितले़सदरची घटना गुरुवारी सकाळी मला समजल्यानंतर मी पथकासह गावात पोहचलो. येथील बालकांना तत्काळ इगतपुरीच्या ग्रामीणरु ग्णालयात दाखल केले. मात्र या पोषण आहारात असलेला कीडा पोषण आहार शिजविण्यापूर्वी पडला होता की, शिजल्यानंतर टाकण्यात आला याची चौकशी करणे आवश्यक आहे. यासाठी हा कीडा आणि पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून, यातून हा हलगर्जीपणा सिद्ध झाल्यास दोषींवर निश्चित कारवाई करू.- सोपान ढाकणे,प्रकल्पाधिकारीतळेगाव येथील अंगणवाडीमधील पोषण आहारात पडलेल्या सापाची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक तळेगावात दाखल झाले असून, हे पथक पोषण आहार व मृत सापाची तपासणी करण्यासाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालात नंतर चित्र स्पष्ट होईल.सुरेश कुंदे, पालक