शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

सागवानाची तस्करी; टेम्पो पकडला

By admin | Updated: July 9, 2016 00:33 IST

सुरगाणा वनविभागाची कामगिरी : लाकूड, वाहनासह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

 सुरगाणा : पुढे भरधाव वेगातील चोरट्या सागवानाची तस्करी करणारा ४०७ टेम्पो. पाठलाग करणारे वनविभाग कर्मचाऱ्यांचे शासकीय वाहन आणि वनविभागाच्या मागे चोरटी वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या सहकाऱ्यांची डस्टर कार व नंबर नसलेली एक नवी मोटरसायकल असा चार वाहनांचा एखाद्या अ‍ॅक्शन चित्रपटात शोभेल असा पाठलागाचा थरार परिसरातील नागरिकांनी मंगळवारी अनुभवला. सुमारे ३५ ते ४० किमी अंतरापर्यंत हा थरार सुरू होता. दरम्यान, स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सागवानाची तस्करी करणारा टेम्पो अडविण्यात यश मिळविले. या प्रकरणी वनविभागाने ८८ हजार २५५ रुपये किमतीचे १.८३५ घनमीटर सागवान लाकडांसह टेम्पो, डस्टर कार व एक नंबर नसलेली मोटारसायकल असा अंदाजे १५ ते १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकास ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (दि. ५) सुरगाणा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना खुंटविहीर गावाकडून सागवानी लाकडाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश सातपुते यांनी वनपाल प्रमोद पवार, काशीनाथ गायकवाड, सुभाष भोये, नाना राठोड, गाडर, तुकाराम चौधरी, तुषार भोये, हेमंत गावित, अश्पाक शेख, ठाकरे, राजकुमार पवार या कर्मचाऱ्यांसह डोल्हारे येथील चार रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी सापळा लावला. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास खुंटविहीर गावाकडून टाटा ४०७ टेम्पो (क्र . एमएच ०१- एल २२४१) वेगाने येत असल्याचे वन कर्मचाऱ्यांना दिसला. त्यांनी या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने चकवा देऊन सदर वाहन सारणे आवणमार्गे पुढे नेला. हेच वाहन सागवान तस्करांचे असल्याची खात्री झाल्याने वन कर्मचाऱ्यांनी या टेम्पोचा पाठलाग सुरू केला. टेम्पोचालक नागमोडी वाहन चालवून वन कर्मचाऱ्यांच्या वाहनाला पुढे निघू देत नव्हता. काही अंतर गेल्यानंतर एक खासगी वाहन पाठलाग करीत असल्याचे वन विभागाच्या वाहनचालकाच्या लक्षात आले. पळसन गावाजवळ वन कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करून तस्करांचे वाहन असल्याचे सांगताच पळसन गावातील काही ग्रामस्थांनी टेम्पोचा पाठलाग सुरू केला. आमदा (प) गावाजवळ अखेरीस टेम्पो पकडण्यात वनविभागाला यश आले. चालक वाहन सोडून पसार झाला, तर गर्दीचा फायदा घेऊन डस्टर मालक फरार झाला. या दोन्ही वाहनांची झडती घेतली असता, टाटा टेम्पोमध्ये २०, तर डस्टर गाडीत (क्र .डीएन ०९ जे १००७) २ नग असे २२ सागवानी चौपट मिळून आले. वाहनांसह हा मुद्देमाल वणी डेपोत जमा करीत असतानाच रात्री ११.३० वाजेच्या सुमारास खुंटविहीर येथील गणेश वाघमारे (२९) हा होंडा शाईन या नंबर नसलेल्या दुचाकीने डेपोत आला व वन कर्मचाऱ्यांना सागवान व वाहने जप्त केल्याप्रकरणी दमदाटी करू लागला. त्यास वन कर्मचाऱ्यांनी मोटरसायकलसह ताब्यात घेऊन सुरगाणा पोलिसांच्या ताब्यात दिले.