शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘भेटकार्ड’पुढे एसएमएस पडले फिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:53 IST

संपर्क साधनांचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने टपालाच्या माध्यमातून दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविणे कालबाह्य झाल्याची चर्चा होत असताना आधुनिक साधनांचा वापर करणाºयांनीच ही चर्चा वायफळ ठरविली आहे.

नाशिक : संपर्क साधनांचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने टपालाच्या माध्यमातून दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविणे कालबाह्य झाल्याची चर्चा होत असताना आधुनिक साधनांचा वापर करणाºयांनीच ही चर्चा वायफळ ठरविली आहे. यावर्षी टपाल खात्याच्या माध्यमातून सुमारे ५५ हजारापेक्षा अधिक भेटकार्डे एकमेकांना पाठविण्यात आली आहेत. यामध्ये छापील भेटकार्डाबरोबरच पोस्ट कार्डावरील मजकूर आणि हाताने रेखाटलेल्या चित्रांचा समावेश असलेल्या भेटकार्डांचा समावेश अधिक होता.आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि या साधनांचा वापर करून संपर्कात रहाणे ‘स्टेटस’ मानले जात असताना भेटकार्डाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा पाठविणाºयांची संख्याही कमी नसल्याचे समोर आले आहे. आजकाल कोणताही सण, सोहळा आणि उत्सवात एकमेकांना शुभेच्छा पाठविण्याची क्रेझ आहे. एका क्लिकवर सारे काही होत असल्याने काही क्षणातील ही देवाण-घेवाण संख्यात्मक पातळी गाठते. परंतु ती मनाला भिडतेच याबाबत शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. किंबहुना अशा शुभेच्छांचा संचय करणे शक्य होईलच किंवा त्या मांडून ठेवणेही शक्य नसल्याने आकर्षक रंगसंगती, चित्र, देखावा आणि संदेशाच्या अर्थपूर्ण ओळी असलेली भेटकार्डे अनेकांना भावली आहेत. त्यामुळेच यंदा भेटकार्ड पाठविणाºयांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. नाशिक टपाल कार्यालयातून यावर्षी दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविण्यासाठीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, ५५ हजारापेक्षा जास्त भेटकार्डे नातेवाइकांना एकमेकांना पाठविली आहेत. यामध्ये तयार भेटकार्डांबरोबरच हाताने लिहिलेले शुभेच्छा संदेशांचे पोस्टकार्ड आणि आंतरदेशीपत्रांचाही समावेश होता. वरवर टपाल खात्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली असल्याचे बोलले जात असताना शुभेच्छा संदेश पाठविण्यासाठी टपाल खात्यासमोर गर्दी झाल्याने टपाल खात्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.