शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटात धुमश्चक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST

सामनगाव रोड जयप्रकाशनगर येथील संदीप जगन पिंपळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी रात्री १० च्या सुमारास अश्विनी ...

सामनगाव रोड जयप्रकाशनगर येथील संदीप जगन पिंपळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी रात्री १० च्या सुमारास अश्विनी कॉलनीतील म्हाडा इमारतीच्या २ नंबर गेटवर मोबाईलवर बोलत होता. यावेळी लहान मुलांच्या खेळण्यातील वादावरून संशयित नवनाथ बाबादेव पंडित, राम मोतीराम मोरे, मन्या कैलास डोगले, आकाश सुनील बावीस्कर, श्याम मोतीराम मोरे, सागर रामदास पगारे, अज्जू बाळू निळे, कुणाल सूर्यवंशी, साधू शांताराम चौधरी (सर्व रा. अश्विन कॉलनी) यांनी संदीप पिंपळेकडे येऊन हा विशाल पवारचा मित्र आहे, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. जखमी संदीपला त्याचा मित्र योगेश आहेर हा दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आला असता त्याच्यावरही कोयत्यानेेे व विळ्याने वार करून तसेच लोखंडी रॉडने मारहाण करत त्यालाही गंभीर जखमी करण्यात आले. यामुळे अश्विनी कॉलनी परिसरात तणाव पसरला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

---

सामनगावरोडला युवकाची आत्महत्या

नाशिकरोड : सामनगावरोडवरील औटे मळा येथील रहिवासी युवक प्रशांत मधुकर औटे (२२) याने रविवारी (दि.२१) सकाळी १० वाजेच्या पूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

---

४० वर्षीय बंदिवानाचा मृत्यू

नाशिकरोड : जेलरोडवरील मध्यवर्ती कारागृहातील बंदिवान राजेंद्र पुंडलिक निगड (४०) हा कोणत्या तरी आजाराने आजारी असल्याने त्याला सोमवारी (दि.२२) जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आजाराचे निदान होऊ शकणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

---