शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हातनोरे मराठी शाळा झाली स्मार्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:59 IST

कसबे सुकेणे : एक हात मदतीचा, ठेवा आठवणींचा या योजनेंतर्गत दिंडोरी तालुक्यातील हातनोरेची जिल्हा परिषद शाळा स्मार्ट होत आहे. स्वातंत्र्य दिनी नाशिकमधील काही दानशूरांनी या शाळेला महान व्यक्तींच्या प्रतिमा, कचरापेट्या, ध्वनिक्षेपण यंत्रणा भेट देत स्वातंत्र्य दिन साजरा केला.

ठळक मुद्देएक हात मदतीचा उपक्र म : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कसबे सुकेणे : एक हात मदतीचा, ठेवा आठवणींचा या योजनेंतर्गत दिंडोरी तालुक्यातील हातनोरेची जिल्हा परिषद शाळा स्मार्ट होत आहे. स्वातंत्र्य दिनी नाशिकमधील काही दानशूरांनी या शाळेला महान व्यक्तींच्या प्रतिमा, कचरापेट्या, ध्वनिक्षेपण यंत्रणा भेट देत स्वातंत्र्य दिन साजरा केला.दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हातनोरे येथे स्वातंत्र्य दिन अभिनव उपक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब चारोस्कर व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसंबंधी संदेश देत पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी पवार व जलनायक योगेश बर्वे यांनी स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले. नवनाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्था नाशिकचे अध्यक्ष प्रकाश बर्वे यांनी भारताच्या क्रांतिकारकांच्या इतिहासरूपी माहितीद्वारे एकता, बंधुभाव, संघटनेतून विकास साधावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना केले.हातनोरे गावात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी जालिंदर कानडे, जालिंदर जाधव, चेतन कानडे, प्रवीण चव्हाण, अक्षय इंगळे, रोहित कानडे, मुख्याध्यापक खोटरे व शिक्षक उपस्थित होते. लहान-मोठ्यांचे वाढदिवस किंवा स्मृतिदिनानिमित्त ‘एक हात मदतीचा, ठेवा आठवणींचा’ या योजनेंतर्गत नीलेश लोमटे यांनी शाळेला १६ महान व्यक्तींच्या व समाजसुधारकांच्या प्रतिमा, नाशिक आयमा व अविनाश बोडके यांनी शालेय स्वच्छता व सुशोभीकरणासाठी दहा कचरापेटी व १० फुलझाडांच्या कुंड्या, चौघुले यांनी प्रशस्त साउण्ड सिस्टीम, शिक्षक व ग्रामस्थांकडून कपाटे आदी वस्तू शाळेला भेट दिल्या.