शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

विज्ञानाचा ‘स्मार्ट’ आविष्कार

By admin | Updated: December 30, 2015 22:59 IST

विद्यार्थ्यांचे संशोधन : विभागीय प्रदर्शनात शंभर प्रकल्प सादर

नाशिक : सौर ऊर्जेवर चालणारा फवारणी रोबो, सोसायटीच्या टाकीमध्ये सायकलद्वारे पाण्याचा पुरवठा, स्मार्ट फिरता पूल, स्मार्ट व्हर्टिकल वाहनतळ, हायड्रोलिक वृक्ष पुनर्रोपण यंत्र, वायू शुद्धीकरण यंत्र, पायऱ्या चढताना ऊर्जेची निर्मिती, स्मार्ट सिटीमधील स्मार्ट पर्यावरणपूरक रस्ते अशा एका ना अनेक कल्पना शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधनातून दिसून आल्या. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस प्रकल्पाच्या सादरीकरणातून वैज्ञानिकाच्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडविले.निमित्त होते, क. का. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय विभागीय विज्ञान प्रदर्शनाचे! स्मार्ट सिटी संकल्पना, ऊर्जा संवर्धन, नवीन ऊर्जा स्त्रोत, जलसंवर्धन, सांडपाणी- कचरा व्यवस्थापन, जल- वायू प्रदूषण नियंत्रण आदि विषय घेऊन नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमधील विविध माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले. प्रदर्शनाचे उद्घाटन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव एम. व्ही. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष काशीनाथ टर्ले, डॉ. केशव नांदूरकर, प्राचार्य प्रकाश कडवे, व्ही. आर. खपली आदि मान्यवर उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनात विजेच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व तीन उत्तेजनार्थ प्रकल्पांना अनुक्र मे अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, नऊ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, सात हजार रुपये स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, प्रत्येकी तीन हजार रुपयांसह दोन विशेष पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. प्रदर्शनाचा निकाल गुरुवारी (दि.३१) घोषित करण्यात येणार असून, संध्याकाळी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. विभागातून विविध मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांच्या शाळांमधील एकूण २३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून एकूण शंभर प्रकल्प मांडण्यात आले आहेत.